PM Modi Sabha In Pune | हा मोदी आहे, घरात घुसून मारणार; PM नरेंद्र मोदींचा दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Sabha In Pune | घरात घुसून मारणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटल आहे. 10 वर्षाआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालं की नाही. जे इथे शेजारुन (पाकिस्तान) स्फोट करायची सवय होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. पीएफआयवर प्रतिबंध लावला, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर (Pune Race Course) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत हे वक्तव्य केलं आहे. (PM Modi On Terrorist)

मोदी अजूनही जिवंत आहे

देशात कधीच धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम इंडिया आघाडी करत आहे. पण मोदी अजूनही जिवंत आहे. मोदी हे होऊ देणार नाही. काँग्रेसच्या काळात दहशतवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुण्यात रक्तस्त्राव झाला. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत होत होते. पण हा मोदी, घरात घुसून मारणार असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं आहे. (PM Modi Sabha In Pune)

त्यांना आता अन्न मिळणं कठीण

दहा वर्षापूर्वी भारतावर दहशतवादी हल्ले होत होते. मुंबई, काशी, अयोध्यामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले की नाही. जे इथे शेजारुन स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवत होते, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. हा मोदी आहे, घरात घुसून मारेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

मोदी पहिल्यांदाच पुण्यात मुक्कामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पुण्यात मुक्कामी असणार आहेत. पुण्यातील राजभवनात ते मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री या परिसरातील पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात येणार आहे. त्याचसोबत राजभवनाच्या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. आज रात्री मुक्काम करुन मोदी उद्या सकाळी पुन्हा धाराशिव आणि माळशिरसकडे रवाना होणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi On Sharad Pawar | पंतप्रधान मोदी शरद पवारांचे नाव न घेता म्हणाले,
”महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा”, तर राहुल गांधींची उडवली खिल्ली…

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती