कलम ३७० : मतभेद मान्य पण देशहित सर्वोच्च ; विरोधकांना नरेंद्र मोदींचा संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित केले. हे पाऊल का आवश्यक आहे हे त्यांनी स्पष्ट केले आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेला हे आपल्या हिताचे कसे आहे याची ग्वाही दिली. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनाही संदेश दिला. त्यांनी म्हटले की, मतभेद मान्य पण देशाचे हित सर्वोच्च आहे.

कलम ३७० हटविल्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विरोधकांना उद्देशून मोदी म्हटले की, लोकशाहीमध्ये हे अगदी स्वाभाविक आहे. काही लोक या निर्णयाच्या बाजूने आहेत तर काहींचे यावर मतभेद आहेत. मी त्यांच्या मतांचा आणि आक्षेपांचा आदर करतो. केंद्र सरकारही त्यावरील चर्चेला उत्तर देत आहे. हे आपले लोकशाही कर्तव्यही आहे.

मोदी म्हटले की, परंतु मी त्यांना देशहिताच्या दृष्टीने काम करण्याचे आव्हान करतो. देशाच्या भावनांचा आदर करा. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त