PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोला दाखवला हिरवा कंदील; मोदींच्या हस्ते विविध कामांचे लोकर्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (रविवार) पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) साजरा करत आहे. स्वातंत्रात पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak), गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale), बाबा साहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनाही आदरपूर्वक लक्षात ठेवले आहे. आमच्या हृदयात शिवछत्रपतींची प्रतिमा सदैव आहे.

 

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते झाले. महाराजांचा पुतळा येणाऱ्या पिढीत राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करेल. माझे सौभाग्य आहे मेट्रोच्या (Pune Metro) भूमीपूजनासाठी बोलवले होते व आज मलाच उद्घाटनासाठी बोलावले. पूर्वी भूमीपूजन व्हायचे कधी पूर्ण होईल हे सांगता येत न्हवते. यातून एक लक्षात येते कामे गतीने होत आहे. आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी (R. K. Laxman Art Gallery) पुणेकरांना उपलब्ध होत आहे. उषा नारायण (Usha Narayan) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी खूप पाठपुरावा केला. (PM Modi Visit To Pune)

 

पुणे आपली सांस्कृतिक (Cultural), आध्यात्मिक (Spiritual) व राष्ट्रभक्तीच्या (Patriotism) योगदानासाठी मोठी आहे. आयटी (IT) चा विकास झाला आहे. येथे विकासाची गरज आहे. यासाठी आमचे सरकार हाच विकास गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मेट्रो मुळे पुण्याची वाहतूक (Pune Traffic) गतीने होईल. कोरोना (Corona) सारख्या महामारीत मेट्रोचे काम सुरू राहिले. या मेट्रो मुळे दरवर्षी 25 हजार टन कार्बन (Carbon) उत्सर्जन रोखले जाईल.

मेट्रो हाच एकमेव पर्याय

आपल्याकडे वेगाने शहरीकरण (Urbanization) होत आहे. 2030 पर्यंत शहरातील लोकसंख्या 60 कोटीच्या पुढे जाईल. या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक संधी उपलब्ध होतील पण त्याचवेळी अनेक अडचणी पण येतील. किती उड्डाण पूल बांधणार, किती रस्ते रुंद करणार. याला मर्यादा आहेत. यावर एकच उपाय म्हणजे मास ट्रान्सपोर्ट (Mass Transport) अर्थात मेट्रोच (Metro) हाच एकमेव पर्याय आहे. (PM Modi Visit To Pune)

 

प्रत्येक शहरात ग्रीन ट्रान्सपोर्टचा वापर व्हावा

महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्क चा वेगाने विस्तार होत आहे. मी आवाहन करतो आपण कितीही मोठे असलो तरी आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने मेट्रोचा वापर केला पाहिजे. आमच्या सरकारचा प्रयत्न आहे प्रत्येक शहरात ग्रीन ट्रास्पोर्ट (Green Transport) चा वापर व्हावा यासाठी स्मार्ट सुविधा (Smart Convenience) निर्माण करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येक शहरात एनर्जी एफिशिएंट (Energy Efficient) व्हावी, पेयजल व ड्रेनेज सुविधा सुधारण्यासाठी अमृत योजना (Amrit Yojana) राबवत आहोत. रेरा कायदा (Rera Act) आणून मध्यमवर्गीयांना घर घेताना सुरक्षा देण्याचे काम केले आहे. शहरात स्वछता ठेवण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित करत आहोत.

 

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा

पुणे शहर ग्रीन एनर्जीचा गतीने वापर होत आहे. इथेनॉल चा (Ethanol) वापर वाढत आहे. प्रदूषण (Pollution) आणि पुरापासून मुक्ती देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) मदत देत आहे. पुण्यात नदीचे महत्व समजावे यासाठी वर्षातून एकदा नदी उत्सव (River Festival) साजरा करायला हवा. प्रकल्पांचे काम गतीने व्हावे यासाठी आम्ही स्वतंत्र अभियान राबवत आहोत.

 

मराठी यांच्यासह अनेक ओरतिभाषाशैली साहित्य एक कलाकार यांच्या सह अनेक प्रतिभाशाली लोकांच्या राहिवासाने पावन झालेल्या पुणेकरांना माझा नमस्कार.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिहांसनाधिष्ट पुतळ्याचे अनावरण, मुळा – मुठा नदी सुधार आणि नदी काठ सुधार योजना भूमिपूजन, 140 ई बसेस (E Buses) व ई डेपोचा (E Depot) लोकार्पण आणि आर. के. लक्ष्मण गॅलरीचे उद्घाटन झाले. कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या (MIT College) मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Singh Koshari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athavale), राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (State Industry Minister Subhash Desai), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde), राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar), भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar), गिरीश बापट (Girish Bapat), पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे (Pimpri Chinchwad Mayor Mai Dhore), उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairperson Hemant Rasne), भाजप पक्षनेता गणेश बिडकर (BJP Party Leader Ganesh Bidkar), भाजपचे आमदार उपस्थित होते.

 

अजित पवारांनी मानले पंतप्रधानांचे आभार

अजित पवार म्हणाले, अनेक वर्षे इच्छा असलेले प्रकल्प सुरू होत आहेत, उद्घाटीत होत आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित राहिले याबाबत मी त्यांचे आभार मानतो. ही छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमी आहे. राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांनी पुण्याचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू केले, ते कार्य अव्याहत सुरू आहे. 2010 ला मेट्रोला मान्यता मिळाली. मध्यंतरी काहींनी मेट्रो खालून न्यावी की एलिव्हेटेड (Elevated) करावी यामुळे काम लांबले. परंतु गडकरी यांनी कडक भूमिका घेऊन प्रकल्प पुढे नेला. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) ते निगडी (Nigdi) आणि स्वारगेट (Swargate) ते कात्रज (Katraj), रामवाडी (Ramwadi) ते वाघोली (Wagholi), खराडी (Kharadi) ते स्वारगेट या मार्गाचे डीपीआर (DPR) करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाना लवकर मंजुरी व मदत करावी.

 

कुठलेही अनावश्यक वक्तव्य सहन करून घेतले जाणार नाही

नदी सुधार व सुशोभीकरण चे भूमिपूजन होत आहे. नदी पात्रातील जलस्रोत व पर्यावरणाला धक्का लागणार नाही, पूरही येणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
आम्ही त्याकडे बारकाईने लक्ष देऊ. राज्याने प्रदूषण कमी करण्यासाठी (E Vehicle) धोरण स्वीकारले आहे.
महत्वाच्या व्यक्तींकडून महाराष्ट्राच्या भुषणावर हल्ले होत आहेत. हे कुठल्याही प्रकारे सहन केला जाणार नाही.
त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले जातील.
हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल कुठलेही अनावश्यक वक्तव्य सहन करून घेतले जाणार नाही.
आम्ही विकासात कुठलेही राजकारण करत नाही,
असे नमूद करत यापुढे महाराष्ट्राच्या प्रतीकांचा अवमान कोणी करू नये असा इशारा यावेळी त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिला.

देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याकरता आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज मेट्रो धावली आहे.
पहिले तिकीट पंतप्रधानांनी तिकीट काढून प्रवासही केला. महामेट्रो ने विक्रमी वेळेत काम पूर्ण केले.
पुण्यातील गंगा शुद्धीकरण करण्यासाठी केंद्राने निधी उपलब्द करून दिला. येत्या काळात या नदीत एकही थेंब मैलापाणी जाणार नाही.
येत्या काळात पीएमपी (PMP) चा संपूर्ण ताफा पोलुशन फ्री होईल. या सर्वकामे केवळ केंद्र सरकार भक्कम पाठीशी राहिल्याने झाला आहे.
आपण पुण्याला व महाराष्ट्राला भरपूर दिले आहे. नाशिक मेट्रो व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच मंजुरी द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

खऱ्या अर्थाने कार्य पूर्ती – महापौर मुरलीधर मोहोळ

प्रास्ताविक करताना महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) म्हणाले, प्रत्येक पुणेकरांसाठी आनंदाचा क्षण आहे.
ज्यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन झाले त्यांच्याच हस्ते मेट्रो चे उदघाटन झाले.
यामुळे हा खऱ्या अर्थाने आश्वासन नाही तर कार्य पूर्ती केली हा खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातून नगरसेवक आणि अधिकारी खऱ्या अर्थाने सुराज्याच्या आदर्श घेतील.
नमामी गंगेच्या पार्श्वभूमीवर मुळा मुठा नदीचे पुनर्जीवन (Pune River Rejuvenatio) करण्यासाठीच्या प्रकल्पात समावेश केला.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhas Desai),
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis),
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आमदार सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble), भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik),
महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne),
गणेश बिडकर (Ganesh Bidkar), भाजपचे राजेश पांडे (BJP Rajesh Pandey)
यांच्यासह पुण्यातील भाजप आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title :- PM Modi Visit To Pune | Prime Minister Narendra Modi gives green light to Pune Metro Dedication of various works at the hands of Modi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा