कृषी कायद्यावर अखेर PM मोदींनी सोडले मौन; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. त्यावर अखेर आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले. ते म्हणाले, ‘कृषी कायद्यात काही कमी असल्यास त्यामध्ये बदल करण्यास सरकार तयार आहे’.

संसदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची अजूनही प्रतिक्षा आहे. जर कृषी कायद्यात काही कमी असल्यास त्यामध्ये बदल करण्यास सरकार तयार आहे. कायदा बनविल्यानंतरही मंडई बंदी झाली ना MSP वर बंदी आली. जुना कायदा जशाच तसा आहे, फक्त त्यामध्ये नव्या पर्यायांचा समावेश केला आहे. नव्या कायद्यात शेतकऱ्यांना बंधन नाही. पण प्रगतशील समाजासाठी कायदा गरजेचा असल्याने हा कायदा बनवला आहे. त्यामुळे त्यामागचा हेतू चांगला असल्याने आता रिझल्टही चांगलाच येईल.

तसेच या कृषी कायद्याबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळे अफवा पसविणारे सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचा विश्वास जिंकू शकतो. सध्या जे काही खरं सुरु आहे ते थांबविण्यासाठी काहींकडून गोंधळ घातला जात आहे.

नवा पर्यायांचा समावेश
शेती हा आपल्या संस्कृतीचा हिस्सा आहे. पण सध्या ‘आम्ही मागितले नाही तर दिले का?’, असा नवा पर्याय संसदेत सुरु आहे. याशिवाय जुन्या विचारांनी शेतकऱ्यांचे भले होऊ शकत नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.