PM Narendra Modi | मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी पंतप्रधान मोदींचा पुढाकार, महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांची तातडीची व्यापक बैठक

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुचनेनुसार सीमाभागातील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये कर्नाटक सरकार (Karnataka Government) आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) यांच्यात व्यापक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, सीमाभागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या (PM Narendra Modi) या पुढाकारामुळे अनेक दशके प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Issu) लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. 1956 पासून सीमावासीय महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत. अनेकवेळा या मुद्यावरून हिंसक आंदोलनेही झाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या प्रश्नात मध्यस्थी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. नक्की कोणता निर्णय मोदी घेणार याबाबत उत्सुकता आहे. सीमाप्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे संयुक्त आणि व्यापक बैठक कधीच झाली नव्हती. मोदींच्या सूचनेनुसार ही बैठक प्रथमच होत असून हा प्रश्न सुटेल का, अशी चर्चा दोन्ही बाजूकडून सुरू आहे. आजच बेळगावमध्ये (Belgaum) काळा दिन पाळून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ही बैठक कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये (Shivaji University, Kolhapur) होणार आहे. सीमा भागातले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. अलमट्टी धरणाचा (Almatti Dam) फटका कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगलीला (Sangli) पुरामुळे बसतो, या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
हा विषयही या बैठकीत चर्चेसाठी येणार आहे. सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर हत्तींचा वावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
होत आहे. या हत्तींना कशाप्रकारे थोपवायचे, अशा विविध मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

सीमाभागातील अलमट्टी धरणांची उंची, सीमाभागात असलेला हत्तीचा उपद्रव, गर्भलिंग चाचण्या, शालेय दाखले
याबाबत यात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातून लातुर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर कर्नाटकच्या
सीमवर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.

Web Title :-  PM Narendra Modi | maharashtra karnataka belgao issue pm narendra modi called meeting of governor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘गरिबाच्या पोरीचं प्रेम म्हणजे ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीचं प्रेम म्हणजे…’

Pune Crime | दरमहा 15 टक्के दराने व्याज घेणारा सावकार आणि वसुली करणाऱ्यावर खंडणी विरोधी पथक-2 कडून FIR