बना ‘भाग्यशाली’ महिला, सांभाळा PM मोदींचं ‘ट्विटर-फेसबुक’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया सोडणार या चर्चांना अखेर पंतप्रधान मोदींनीच पूर्णविराम लावला आहे. एका ट्विटमध्ये पीएम मोदींची स्पष्ट केले की यंदाच्या महिला दिनी 8 मार्चला ते आपले सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना संभाळण्यास देतील, ज्यांच्या जीवनाने आणि कामाने आपल्याला प्रेरणा मिळू शकते.
काल, सोमवारी पंतप्रधान मोदींनी एक ट्विट करत सर्वांनाच धक्का दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की रविवारी ते आपले सोशल मीडिया अकाऊंट सोडू इच्छित आहे. पीएम मोदींच्या या ट्विटचा अर्थ लोकांनी काढला की ते सोशल मीडिया अकाऊंट वापरणंच बंद करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी केला प्लॅनचा खुलासा –
हे ट्विट केल्यानंतर 16 तासांनंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या योजनेचा खुलासा केला. पंतप्रधान मोदी महिला दिनी सोशल मीडिया अकाऊंट काही महिलांकडे सुपूर्त करणार आहेत. त्यांनी ट्विट केले की या महिला दिनी मी माझे सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना समर्पित करेल ज्यांच्या जीवनाने आणि कामाने मला प्रेरित केले. ते त्या लाखोंना प्रेरित करण्यासाठी प्रोस्ताहन देतील.
पंतप्रधान पुढे म्हणाले, तुम्ही ती महिला आहात किंवा तुम्ही अशा कोणत्या महिलेला ओळखतात ज्यांनी तुम्हाला प्रेरित केले आहे ? तुमची अशी कोणती कथा असेल तर ती सांगा. #SheInspiresUs असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला.
आयडीया द्या, पंतप्रधान मोदींचे ट्विटर संभाळा –
पंतप्रधान मोदी म्हणाले की तुम्ही #SheInspiresUs वापरुन तुमची कथा ट्विटर, फेसबूक किंवा इंस्टाग्रामवर सांगू शकतात. ते म्हणाले की तुम्ही एक व्हिडिओ देखील तयार करु शकता आणि #SheInspiresUs ने यूट्यूबवर शेअर करु शकतात.
पंतप्रधान मोदी म्हणाले की यातीलच काही निवडक महिलांना ते महिला दिनी आपले सोशल मीडिया अकाऊंट संभाळण्यासाठी देतील. पंतप्रधान म्हणाले की तुम्ही अशा महिलांचे विचार जगाला सांगा.