पुढील महिन्यात भारत-जपानमध्ये महत्त्वपूर्ण बैठक ! PM मोदी ‘या’ 3 देशांसह चीनला घालतील ‘घेराव’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनच्या सीमा विवादाच्या दरम्यान भारत आणि जपानची महत्त्वपूर्ण बैठक (India-Japan Summit) होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भेटू शकतात. दोन्ही देशांमधील या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण लष्करी संधी होऊ शकतात. तसेच काही जपानी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स भारतात हलविण्याची चर्चा आहे.

या 3 देशांसह मिळून भारत चीनला घेरणार

या बैठकीत जपानबरोबर लडाख वादावर चर्चा होणार नसली तरी चीनसाठी हा निश्चितच एक इशारा ठरेल. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे भारत हे स्पष्ट करेल की चीनला चौफेर घेरण्यासाठी 3 देशांशी आपले संबंध चांगले होत आहेत. या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला उधळण्यासाठी चारही देश एकत्र उभे राहिले आहेत.

भारत आणि जपान यांच्यात आता अधिग्रहण आणि क्रॉस सर्व्हिसिंग करार (ACSA) होणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना अधिक सहकार्य करण्यास समर्थ होईल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाशी भारताने असेच करार केले आहेत.

बैठकीच्या तारखांमध्ये झाले मोठ्या प्रमाणात बदल

या बैठकीच्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. याआधी डिसेंबर 2019 मध्ये गुवाहाटी येथे बैठक होणार होती. परंतु नंतर सीएएविरोधातील निषेधामुळे बैठकीस पुढे ढकलले गेले. त्यानंतर ऑक्टोबरची तारीख निश्चित केली गेली पण आता त्यापूर्वी ही बैठक 10 सप्टेंबरला होणार आहे.