लोकशाहीचा गळा घोटणारे, लोकशाही वाचवा म्हणत आहेत : नरेंद्र मोदी 

सिल्वासा : वृत्तसंस्था – विरोधकांनी केलेली आघाडी हि माझ्या विरोधात नसून ती देशाच्या विरोधात आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर तोंड सुख घेतले आहे. आमचे सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही. ते १३० कोटी भारतीयांसाठी काम करत आहे. लोकशाहीचा गळा घोटणारेच आता लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

कोलकत्यात आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी बाकावरील एकूण २२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलवून नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात महारॅली पार पाडली आहे. याच महारॅलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ऐकीवर निशाण साधला आहे. सिल्वासा येथे कार्यक्रमासाठी आले असता नरेंद्र मोदी यांनी हि टीका केली आहे.

भाजपच्या नेकीची हि कमाल आहे कि, बंगालमध्ये सर्व भ्रष्ट पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यवाही सुरु करताच काँग्रेसला भीती वाटू लागली म्हणूनच त्यांनी महाआघाडीच्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरु केली. भारत हा देश सर्वोत्तम देश व्हावा अशी आमची धारणा आहे. याच ध्येयातून आम्ही १३० कोटी लोकांसाठी काम करत आहे. आमचे लक्ष कामावर आहे कारण आम्ही कामगार आहोत नामदार नाहीत असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.

लोकशाहीचा गळा घोटणारे देश वाचवण्याच्या  लोकशाही वाचवण्याच्या भाषा बोलतात तेव्हा जनताही त्यांच्याकडे आश्चर्यपूर्वक बघू लागते. भ्रष्टाचारावर मी कडक पाऊले उचलली आहेत. म्हणून काही पक्ष आमच्यावर नाराज झाले आहेत त्यांचे नाराज होणे हि नैसर्गिक आहे. आता पूर्वी सारखी पैसे लुटता येत नाही म्हणून हे महाआघाडी करून लढत आहेत. अद्याप महाआघाडी पूर्ण झाली नाही तोपर्यंतच कोणाला काय पद देणार याची सौदेबाजी सुरु आहे अशा शेलक्या शब्दात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.