PM नरेंद्र मोदींनी दिलं सकाळी सरप्राइज, अचानकपणे गुरूव्दारामध्ये पोहचले

पोलिसनामा ऑनलाईन – दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. दरम्यान, याठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली नव्हती. सामान्य दिवसाप्रमाणेच व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्था देखील नेहमीप्रमाणेच होती. यावेळी कोणता विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदी दिवसानिमित्त श्री गुरू तेग बहादुर जी यांना आदरांजली अर्पण केली आहे. श्री गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन धैर्य आणि करुणेचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटरवरील संदेशामध्ये म्हटले आहे. ‘शहीदी दिवसानिमित्त महान श्री गुरू तेग बहादुर जी यांना नमन करत न्याय्य आणि समावेशक समाजाच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे स्मरण करतो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या अचानक दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत.