PM Vishwakarma Yojana | पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी पंतप्रधानांची खास ‘विश्वकर्मा योजना’

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – PM Vishwakarma Yojana | स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना अनेक नवीन योजना जाहीर केल्या. लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान मोदी यांनी देशाला नवी दिशा देण्याबरोबर लोककल्याणकारी योजना देखील घोषित केल्या. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषण देताना पंतप्रधान मोदींनी देशातील पारंपरिक कलांवर रोजगार चालवणाऱ्या कारागिरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ (PM Vishwakarma Yojana) जाहीर केली आहे. विश्वकर्मा जयंतीच्या मुहूर्तापासून याचा लाभ देशातील लाखो गरीब कारागिरांना घेता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक नव्या योजनांचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला. यामध्ये सर्वांत लक्षवेधी ठरली ती म्हणजे केंद्र सरकारतर्फे (Central Government) जाहीर करण्यात आलेली ‘विश्वकर्मा योजना’. देशातील पारंपारिक कलेचा वापर करुन रोजचे जीवन जगणाऱ्या लोकांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. येत्या विश्वकर्मा जयंतीपासून (Vishwakarma Jayanti) या योजनेस प्रारंभ होणार आहे. या योजनेचा उद्देश पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना पाठिंबा देण्याबरोबरच, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या या स्थानिक कामगारांना कमी व्याजदरावर कर्ज देणे असा आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 13,000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे.

ADV

विश्वकर्मा योजना यामुळे खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लहान व्यवसाय करणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या अंतर्गत सुमारे 30 लाख पारंपारिक कारागीर आणि कामागारांना याचा फायदा होणार आहे.
सुरुवातीला या योजनेमध्ये 18 ग्रामीण व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे.
विणकर, सोनार, लोहार, कपडे धुणारे कामगार, कुंभार, न्हावी आणि शिंपी असे व्यवयास करणाऱ्या लोकांचा यामध्ये
समावेश करण्यात आला आहे. विश्वकर्मा योजनेंतर्गत त्यांना पहिल्यांदा एक लाख तर दुसऱ्यांदा दोन लाखापर्यंत कर्ज
(PM Vishwakarma Yojana Loan) मिळणार आहे. या कर्जाचा व्याजदर 5% टक्के असा सवलतीमध्ये असून ही कर्जरुपी अर्थ सहाय्याची तरतूद योजनेमध्ये आहे.

या विश्वकर्मा योजनेची अधिकची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnaw) यांनी
दिली असून ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना आधार देण्यासाठी
पंतप्रधानांनी ‘पीएम विश्वकर्मा योजने’ला (PM Vishwakarma Yojana) मंजुरी दिली आहे.
या योजनेंतर्गत सुलभ अटींवर एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘हे फेस टू फेस बोलणारे सरकार… हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही’ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडीओ)