PMC Action On Pubs-Hotels-Restaurants In Pune | महापालिकेचा अनधिकृत हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंटवर कारवाईचा धडाका ! कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, विमाननगरमधील मोठ्या तीन हॉटेल्स व पबसह 40 आस्थापनांवर कारवाई (Videos)

54 हजार 300 चौ.फूटांचे अतिक्रमण जमीनदोस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Action On Pubs-Hotels-Restaurants In Pune | बेकायदेशीरपणे चालविल्या जाणार्‍या रुफटॉप आणि साईड मार्जिन मधील रेस्टॉरंट, बार , पबच्या विरोधात महापालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर घोरपडी, पुणे स्टेशन आणि विमाननगर परिसरात स्वतंत्र पथके तयार करून मुंढवा भागातील हॉटेल, पब आदींचे अनधिकृत शेड काढण्यात आल्या. तब्बल चाळीस ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ५४ हजार ३०० चौ.फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. यापैकी अनेक हॉटेल्स व पब्जवर पुर्वीही कारवाई करण्यात आली होती. यानंतरही पुन्हा अनधिकृत शेडस् उभारल्याने कारवाई केली असून लवकरच संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.(PMC Action On Pubs-Hotels-Restaurants In Pune)

कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल ( रेस्टॉरंट ) आणि पबच्या बांधकामाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. ज्या ठिकाणी मंजुर नकाशापेक्षा अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. मुंढवा – घोरपडी, कल्याणीनगर आदी भागात चाळीस ठिकाणी अनधिकृत शेड उभ्या केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. यानुसार बांधकाम विभागाने कारवाई सुरु केल्याची माहीती मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी दिली.

इमारतीच्या साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्कींगच्या जागा पत्र्याच्या शेडने बंदीस्त करून या जागांचा वापर केला जात आहे, अशा बांधकामावर सातत्याने कारवाई केली जाते, याठिकाणी व्यावसायिकाकडून पुन्हा शेड उभारली जाते. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची भुमिका प्रशासनाने घेतली आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.

बांधकाम विभागाने खराडी भागात सर्व्हे क्रमांक ५९ मधील हॉटेल टीकटीक आणि हॉटेल क्वार्टर या दोन रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली होती. खराडी भागातील दोन रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करून शेड काढून टाकले. खराडी भागातील दोन रूफटॉप हॉटेलवर कारवाई केल्यानंतर आज पालिकेच्या बांधकाम विभागाने अनविंड आणि न्यु हॉटेल हिंगणे या पबवर कारवाई केली. यामध्ये २४ हजार स्केअर फुट बांधकाम आणि पत्राचे शेड हटविण्यात आले. कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली. शहराच्या विविध भागांत इमारतींच्या टेरेसवर, सामाईक जागेत शेड उभी करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल सुरू राहतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

कारवाई करण्यात आलेली हॉटेल्स, पब्जची नावे पुढीलप्रमाणे

हॉटेल शोरमा, करीम्स हॉटेल, किनी डीली, अमाटो, अंकल्स चायनीज, नॉटी इन्जॉय कॅफे, कुलकट, फॉरेन टेन, टलीबार, मोक्का बार, कासाईल केसो, निरंजन कवडे ओपन, मलांका स्पाईस, सिल्वर सील, रोनक सुपर मार्केट, फ्रेन्स विंन्डो, द वायज, ब्लॅक मोचर टेटू, बीस्टो इन, केपी व्हेज, निर्माण रेस्टॉरंट, नंदुस पराठा, वॅटीकन, हॉटेल अनविंड, सुपर क्लब, हॉटेल कार्नीवल, कुकू, हायलॅन्ड, एकांत हॉटेल, मुस्कान व्हेजिटेबल ऍन्ड फूड सेंटर, न्यू मोबाईल फ्लॉवर, दि बाउंटी सिझलर्स, हप्पा, परगोला, रॉक मामाज, २७ देली, द इन्स्परेशन, फ्लोअर वर्क.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंद

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचे फडणवीस आणि पोलिसांवर आरोप; मोहोळांनी दिले प्रत्युत्तर, ”पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखतात”

Porsche Car Accident Pune | आरोपी नातवाची कोर्टात गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे, शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल