PMC Action On Unauthorized Construction Action | धायरी येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Action On Unauthorized Construction Action | पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation (PMC) कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेल्यानंतर अतिक्रमण (Encroachment) आणि अनधिकृत बांधकामे कारवाईच्या (PMC Action On Unauthorized Construction Action) निशाण्यावर आली आहेत. रस्ते (Road), पदपथ (Sidewalk), साइड मार्जिन (Side Margins) न सोडता केलेली बांधकामे तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. धायरी रायकर मळा (Raikar Mala Dhayari), सर्व्हे. नं. 76 येथील सुमारे 50 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर पुणे महानगपालिकेच्या वतीने आज (गुरुवार) कारवाई करण्यात आली.

 

पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या या कारवाईत प्रथमच ‘जॉ कटर’च्या (Joe Cutter) साहाय्याने सहा मजली चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी व संबंधीत बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र विरोध केला. परंतु या विरोधाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता ही कारवाई केली. पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.2 (PMC Construction Department Zone No.2) यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. जॉ कटर मशिन, एक जेसीबी (JCB) व पंधरा कर्मचारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. (PMC Action On Unauthorized Construction Action)

 

 

शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintendent Engineer Yuvraj Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राहुल साळुंके (Executive Engineer Rahul Salunke) यांच्या नियंत्रणाखाली उप अभियंता राहुल तिखे (Deputy Engineer Rahul Tikhe), इमारत निरीक्षक संदेश पाटील (Building Inspector Sandesh Pati), कनिष्ठ अभियंता धनंजय खोले (Junior Engineer Dhananjay Khole), निशिकांत छाफेकर (Nishikant Chhafekar), हेमंत कोळेकर (Hemant Kolekar), किरण अहिरराव (Kiran Ahirrao)इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली.

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजुन तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. तरी नागरिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत. असे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांनी नागरिकांना केले.

 

यावेळी सिंहगड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे (API Pratibha Tandale),
पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे (PSI Kishore Tanpure) व 20 पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

Web Title :- PMC Action On Unauthorized Construction Action | Pune Municipal Corporation’s action on unauthorized constructions at Dhayari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

 

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा