PMC Demolishes Jaihind Talkies In Khadki | पुणे- मुंबई रस्त्यावरील जयहिंद चित्रपटगृह जमीनदोस्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Demolishes Jaihind Talkies In Khadki | पुणे- मुंबई रस्त्यावरील (Pune Mumbai Highway) जयहिंद चित्रपटगृह जमीनदोस्त करण्यात आले आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation) ही इमारत जमीनदोस्त केली. पुणे महापालिकेच्या हद्दीत, पुणे-मुंबई रस्ता हा विकास आराखड्यानुसार ४२ मीटर रुंदीचा करण्याचे काम पथविभागामार्फत सुरू आहे.(PMC Demolishes Jaihind Talkies In Khadki)

यामध्ये २.२ किलोमीटर रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्ता ४२ मीटर रुंदीचा करण्यात येत होता. मात्र, खडकी रेल्वे स्टेशनसमोरील जयहिंद चित्रपट कॅफे पंजाब रेस्टॉरंट येथील रुंदीकरण येथील पोटभाडेकरू उच्च न्यायायलात गेल्याने हे काम रखडले होते. अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

खडकी रेल्वेस्टेशनसमोरील जयहिंद चित्रपट कॅफे पंजाब रेस्टॉरंट येथील रुंदीकरण येथील पोटभाडेकरू उच्च न्यायायलात गेल्याने हे काम रखडले होते.
२४ एप्रिल रोजी याबाबतचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने लागला.
यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या सूचनेनुसार मोबदला म्हणून ४३ लाख रुपये न्यायालयात जमा केले.
त्यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिसरच्या कार्यालयाशी संपर्क साधून, ही जागा तातडीने ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला.

विभागाच्या स्वाक्षरीने मिळकतीचा ताबा पालिकेने घेतला. ही जागा आता मोकळी झाल्याने त्याठिकाणी रुंदीकरणाचे काम
हाती घेतलेले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा रस्ता मिळणार आहे.
याला या कार्यवाहीत पावसकर यांच्यासहीत अधीक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा ,
उपअभियंता गाठे, व कनिष्ठ अभियंता देवडकर सहभागी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)