PMC Draft ward Structure | पुणे महानगरपालिका : प्रभाग रचनेचा नकाशा अधिकृतरित्या जाहीर, अनेकांच्या नगरसेवकपदाच्या ‘आकांक्षा’वर ‘पाणी’?; जाणून घ्या 58 प्रभागांतील मतदार संख्या

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – पुणे महानगरपालिकेची (Pune Corporation) प्रभाग रचना आज (मंगळवारी) अधिकृतपणे जाहीर करण्यात (PMC Draft ward Structure) आली असून पुण्यात 58 प्रभाग आणि तब्बल 173 नगरसेवक असणार हे आता स्पष्टच झाले आहे. सर्वच म्हणजे 58 च्या 58 प्रभागांची मतदारसंख्या ही 50 हजारांपेक्षा जास्त आहे. येरवडा (Yerwada Prabhag) हा सर्वात मोठा प्रभाग आहे. तेथील मतदारसंख्या 71 हजार 390 असणार आहे. करण्यात आलेल्या रचनेमुळं अनेक प्रभागांची पुर्नरचना झाली (PMC Elections). त्यामुळं अनेकांच्या नगरसेवकपदाच्या आकांक्षावर पाणी पडणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. सन 2011 च्या लोकसंख्येनुसार ही प्रभागरचना करण्यात आली आहे. बाणेर-सूस (Baner-Sus Prabhag) या एकाच प्रभागात दोन नगरसेवक असणार आहेत. इतर सर्वच्या सर्व प्रभागांतून 3 नगरसेवक निवडून येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिगेला पोहचलेली प्रभाग रचना अखेर जाहीर झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे तर अनेकांना वेगळं प्लॅनिंग करावं लागणार आहे. (PMC Draft ward Structure)

नगरेसवक पदासाठी इच्छुक असलेल्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. काहीजण तर चांगलेच कामाला लागल्याचे चित्र आपणा सर्वांना पहावयास मिळत होते. आता प्रभाग रचना जाहीर झाल्याने काही जणांचं फावलं आहे तर काही जण अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. (PMC Draft ward Structure)

 

प्रभागांची नावे आणि त्यापुढे प्रभागातील मतदार संख्या पुढील प्रमाणे –

1. धानोरी – विश्रांतवाडी (Dhanori-Vishrantwadi) – मतदार 55488

2. टिंगरेनगर – संजय पार्क (Tingre Nagar-Sanjay Park) – मतदार 56969

3. लोहगाव – विमान नगर (Lohgaon- Viman Nagar) – मतदार 61836

4. वाघोली – इऑन आयटी पार्क (Wagholi – Ion IT Park) – मतदार 58912

5. खराडी – चंदननगर (Kharadi-Chandan Nagar) – मतदार 67367

6. वडगावशेरी (Wadgaon Sheri) – मतदार 60110

7. कल्याणी नगर – नागपूर चाळ (Kalyaninagar-Nagpur Chawl) – मतदार 67739

8. कळस – फुलेनगर (Kalas-Phulenagar) – मतदार 62273

9. येरवडा (Yerawada) – मतदार 71390

10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी (Shivajinagar Gaothan-Sangamwadi) – मतदार 62481

11. बोपोडी -पुणे विद्यापीठ (Bopodi-Pune University) – मतदार 57861

12. औंध – बालेवाडी (Aundh-Balewadi) – मतदार 62050

13. बाणेर – सुस म्हाळुंगे (Baner-Sus Mahalunge) – मतदार 37589

14. पाषाण – बावधन बुद्रुक (Pashan- Bavadhan Budruk) – मतदार 58515

15. पंचवटी – गोखलेनगर (Panchavati – Gokhalenagar) – मतदार 67821

16. फर्ग्युसन कॉलेज  – एरंडवणे (Fergusson College – Erandwane) – मतदार 67103

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर (Shaniwar Peth- Rajendra Nagar) – मतदार 67951

18. शनिवार वाडा – कसबा पेठ (Shaniwar Wada – Kasba Peth) – मतदार 67701

19. रास्ता पेठ – के.ई.एम. हॉस्पिटल (Rasta Peth-KEM Hospital) – मतदार 58994

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड (Pune Station – Tadiwala Road) – मतदार 67129

21. मुंढवा – घोरपडी (Mundhwa-Ghorpadi) – मतदार 67574

22. मांजरी – शेवाळवाडी (Manjari-Shewalwadi) – मतदार 61878

23. साडेसतरानळी – आकाशवाणी (Sadesatranali- Akashwani) – मतदार 55659

24. मगरपट्टा – साधना विद्यालय (Magarpatta- Sadhana Vidyalaya) – मतदार 56446

25. हडपसर गावठाण -सातववाडी (Hadapsar Gaothan-Satavwadi) – मतदार 55782

26. भीम नगर – रामटेकडी (Bhimnagar-Ramtekdi) – मतदार 67721

27. कासेवाडी – हरकानगर (Kasewadi-Harkanagar) – मतदार 68501

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (Mahatma Phule Smarak – Timber Market) – मतदार 57483

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (Khadakmal Aali – Mahatma Phule Mandai) – मतदार 67592

30. जयभवानी नगर –  केळेवाडी (Jayabhavani Nagar – Kelewadi) – मतदार 60237

31. कोथरुड गावठाण – शिवतीर्थ नगर (Kothrud Gaothan – Shivtirtha Nagar) – मतदार 61115

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा (Bhusari Colony-Sutardara) – मतदार 67127

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी (Bavadhan Khurd-Mahatma Society) – मतदार 66216

34. वारजे – कोंढवे धावडे (Warje-Kondhve Dhavade) – मतदार 64919

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे (Ramnagar-Uttamnagar shivne) – मतदार 67422

36. कर्वेनगर (Karvenagar) – मतदार 67260

37. जनता वसाहत – दत्तवाडी (Janata Vasahat-Dattawadi) – मतदार 67332

38. शिवदर्शन – पद्मावती (Shivdarshan-Padmavati) – मतदार 66561

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर (Market Yard-Maharshi Nagar) – मतदार 59580

40. गंगाधाम – सॅलिसबरी पार्क (Gangadham-Salisbury Park) – मतदार 59882

41. कोंढवा खुर्द – मिठानगर (Kondhwa Khurd – Mithanagar) – मतदार 55825

42. सय्यदनगर – लुल्लानगर (Sayyadnagar-Lulla Nagar) – मतदार 54026

43. वानवडी – कौसरबाग (Wanwadi-Kausar Bagh)- मतदार 59414

44. काळेपडळ – ससाणेनगर (Kale Padal-Sasane Nagar) – मतदार 55287

45. फुरसुंगी (Fursungi) – मतदार 55957

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची (Mohammadwadi-Uruli Devachi) – मतदार 55047

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी (Kondhwa Budruk – Yewalewadi) – मतदार 55662

48. अप्पर सुपर इंदिरानगर (Upper Super Indiranagar) – मतदार 56884

49. बालाजी नगर – के के मार्केट (Balaji Nagar – KK Market) – मतदार 58027

50. सहकारनगर – तळजाई (Sahakar Nagar-Taljai) – मतदार 62398

51. वडगाव – पाचगाव पर्वती (Wadgaon-Pachgaon Parvati) – मतदार 67289

52. नांदेड सिटी – सनसिटी (Nanded City-Sun City) – मतदार 66626

53. खडकवासला – नऱ्हे (Khadakwasla-Narhe) – मतदार 63525

54. धायरी – आंबेगाव (Dhayari- Ambegaon) – मतदार 58447

55. धनकवडी – आंबेगाव पठार (Dhankawadi-Ambegaon Pathar) – मतदार 57719

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ (Chaitanyanagar-Bharati Vidyapeeth) – मतदार 56327

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर (Sukhsagar Nagar-Rajiv Gandhi Nagar) – मतदार 55971

58. कात्रज – गोकुळनगर (Katraj-Gokulnagar) – मतदार 57847

Web Title :- PMC Draft ward Structure | Pune Municipal Corporation Ward structure map officially announced Find out the number of voters in 58 wards

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा