PMC Integrated Command and Control Centre | शहर नियोजनासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेने ‘इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर’ ची केली स्थापना

महापालिकेच्या सर्व विभागांसह पोलिस, पीएमपीएमएल आणि स्मार्ट सिटीचा देखील समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Integrated Command and Control Centre | शहर नियोजनासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या सर्व विभागांसह पीएमपीएमएल (PMPML), पोलिस (Pune Police) आणि स्मार्ट सिटी कंपनीमध्ये (Pune Smart City) समन्वय राखून कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) ‘इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर’ PMC Integrated Command and Control Centre (PMC ICCC) सेल स्थापन करण्यात येणार आहे. या सेलच्या प्रमुखपदी उप आयुक्त प्रतिभा पाटील (PMC Deputy Commissioner Pratibha Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महापालिकेच्यावतीने शहरात सेवा – सुविधा पुरविण्यात येतात. महापालिकेचा पथविभाग, मलनि:स्सारण देखभाल व दुरूस्ती विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, पाणी पुरवठा, सुरक्षा, वृक्ष व उद्यान विभाग, आरोग्य विभाग आणि घन कचरा विभागाच्यावतीने सातत्याने नवीन विकास कामे व देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात. ही कामे सुरू असली तरी प्रत्येक कामांत सर्वच विभाग अंतर्गतपणे जोडलेले असतात. उदा. मलनि:स्सारण विभागाचे काम करायचे झाल्यास पाणी पुरवठा, विद्युत विभाग आणि पथ विभागाचा सहभाग असावा लागतो. यासोबतच ही कामे करताना वाहतूकही विस्कळीत होत असल्याने वाहतूक पोलिसांची देखिल मदत गरजेची असते. रोजच्या धबडक्यात एवढ्या मोठ्याप्रमाणावर कामे होत असताना सर्वच विभागांमध्ये समन्वय राखणे अवघड जाते. यामुळे कामाच्या ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा, छोटे – मोठे अपघात ही बाब नित्याची होउन नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. (PMC Integrated Command and Control Centre)

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी महापालिकेच्या सर्व विभागांसह स्मार्ट सिटी, पोलिस, अग्निशामक दल (Pune Fire Brigade) आणि पीएमपीएमएल Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) अशा सर्वच विभागांचे एकत्रित इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विभागांची एकत्रित संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. या सेलच्या माध्यमातून कामकाजावर नियंत्रण ठेवणे, सर्व विभागांचा समन्वय साधणे व वेळेवर कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. या सेलच्या मुख्य नोडल ऑफीसर म्हणून भूसंपादन व माहिती तंत्रज्ञान प्रमुख उपायुक्त प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या सेलचा आपत्ती व्यवस्थापनाच्यावेळी वापर करण्यात येणार आहे.
यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Disaster Management Officer Ganesh Sonune)
यांची सहाय्यक नोडल ऑफीसर म्हणून तर कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्‍वर सोनवलकर (Junior Engineer Dnyaneshwar Sonwalkar)
यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- PMC Integrated Command and Control Centre | Pune Municipal Corporation establishes Integrated Command and Control Center for disaster management along with city planning

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा