PMPML Strike | पीएमपी कंत्राटदारांचा संप मागे, बस सेवा पूर्ववत; पुणेकरांना दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ओलेक्ट्रा (Olectra), हंसा (Hansa), अँथोनी (Anthony), ट्रॅव्हल टाईम (Travel Time) या चार ठेकेदारांनी मागील तीन महिन्यांची बिले थकल्यामुळे संप (PMPML Strike) पुकारला होता. ठेकेदारांना थकीत देयकापोटीची 66 कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाने (PMP Administration) उपलब्ध करुन दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ठेकेदारांनी संप (PMPML Strike) मागे घेतला. त्यामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील बस सेवा पूर्ववत झाली. ठेकेदारांच्या संपाचा फटका विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सामान्य नागरिकांना बसला.

पीएमपीला ठेकेदारांकडून गाड्यांचा पुरवठा केला जातो. यापैकी काही ठेकेदारांनी 90 कोटी रुपयांची थकीत रक्कम मिळावी यासाठी रविवार पासून कोणतीही पूर्वकल्पना न देता संप (PMPML Strike) पुकारला होता. याचा फटका आठ लाख प्रवाशांना बसला होता. संप सुरु झाल्यानंतर पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसोबत चर्चा सुरु केली होती. मात्र, थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत गाड्या संचलनात येणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली होती.

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असून संप सुरु राहिल्यास विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. यापार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांची सोमवारी भेट घेतली होती.

ठेकेदारांची एकूण थकीत रक्कमेपैकी 66 लाख रुपये तातडीने देण्यात आले. त्यासाठी पुणे महापालिकेने
(Pune Municipal Corporation (PMC) 54 कोटी तर पिंपरी चिंचवड महापालिकेने
(Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) 36 कोटी पीएमपीला दिले.
यातून 66 कोटी ठेकेदारांना आणि उर्वरित रक्कम एमएनजीएलला थकीत रकमेपोटी देण्यात आली.
यानंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला.

Web Title :- PMPML Strike | pmpl contractors called off strike after administration made available rs 66 crores fund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

Chhatrapati Sambhajinagar Crime News | लहान मुलांच्या भांडणामध्ये मामाला गमवावा लागला जीव; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी