PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

नवी दिल्ली : PMSBY | गरीब कुटुंबांसाठी केवळ 1 रूपया महिना भरून इन्श्युरन्स योजना केंद्र सरकारने आणली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana – PMSBY) असे तिचे नाव आहे. या योजनेत वार्षिक 12 रुपयांच्या किरकोळ प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतो. याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वर्षात एकदाच प्रीमियम द्यावा लागतो आणि तो सुद्धा 1 रुपया. तो सुद्धा तुमच्या बँक खात्यातून डिडक्ट होतो.

असे करा रजिस्ट्रेशन

कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता. बँक मित्राची मदतही घेऊ शकता. इन्श्युरन्स एजंटशी सुद्धा संपर्क करू शकता. सरकारी आणि प्रायव्हेट विमा कंपनी एकत्रितपणे ही सेवा देतात.

1 रुपया महिना खर्चात 2 लाख रुपयांचे कव्हर

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana चा वार्षिक प्रीमियम अवघा 12 रुपये आहे
म्हणजे दर महिना केवळ 1 रुपयांचा खर्च आहे. दरवर्षी 31 मे पूर्वी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ऑटो डिडक्ट होईल आणि 1 जून ते 31 मे च्या कालावधीसाठी कव्हर मिळेल.

या स्कीममध्ये जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा अ‍ॅक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला पूर्णपणे अपंगत्व आले तर त्यास 2
लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट विमा मिळतो. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर मिळते.

कोण घेऊ शकतात लाभ

यामध्ये 18 वर्ष ते 70 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. 70 वर्षाचे वय ओलांडल्यावर कव्हर संपुष्टात येईल. योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल.

हे देखील वाचा

West Bengal Rape Case | BJP कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Gold Price Today | खुशखबर ! मागील 2 दिवसात सोनं 1700 रूपयांनी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pmsby scheme invest only 1 rupee and get benefits of two lakh rupees know all about pradhan mantri suraksha bima yojana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update