सचिन वाझेंनी रचला संपूर्ण कट ! Antilia Case मध्ये NIA चौकशीत आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Antilia प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Antilia बाहेरील संपूर्ण षडयंत्र सचिन वाझेंनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि ते एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी असल्याचे सिद्ध करण्यासाठी रचले होते. त्यांना हे साध्य करण्याचे होते की ते दहशतवादी संबंधित कट रचल्याचा चांगल्या पद्धतीने तपास लावू शकतात. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांची आतापर्यंत चौकशी आणि संपूर्ण घटनेच्या चौकशीनंतर ही गोष्ट समोर आली की या कटामध्ये सचिन वाझे यांच्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महत्वाचे : चेक ट्रंकेशन (CTS) सिस्टमवर RBI चे निर्देश, तुमच्यावर होणार थेट परिणाम

कोणताही पोलीस अधिकारी स्वतःचे श्रेष्ठत्व साध्य करण्यासाठी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या समोर बॉम्बने भरलेली गाडी ठेऊ शकतो? कोणताही पोलीस अधिकारी त्यांच्या फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी की ते दहशतवादी संबंधित कट रचल्याचा चांगल्या पद्धतीने तपास लावू शकतात हे साध्य करण्यासाठी असे करू शकतात? कोणताही पोलीस अधिकारी फक्त पब्लिसिटी स्टंटसाठी असा कट रचू शकतो? 25 फेब्रुवारीनंतर हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले होते की Antilia च्या बाहेर असे स्फोटक ठेवले होते ज्यातून काही धमाका होणार नव्हता, त्यांना गाडीत ठेऊन ती कार Antilia समोर उभी करण्याचा हेतू काय असेल?
हे ही वाचा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घेणार मोठा निर्णय, मुंबई पोलिस दलात होणार फेरबदल ?

Antilia केसमध्ये चौकशी करीत असलेल्या NIA च्या सूत्रांच्या माहितीनुसार Antilia च्या बाहेर संपूर्ण कट फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी आणि ते सर्वात श्रेष्ठ पोलीस ऑफिसर आहेत तसेच ते दहशवाद्यांशी संबंधित कटाची चांगल्याप्रकारे चौकशी करू शकतात, हे दाखवण्यासाठी रचला गेला होता. NIA सूत्रांच्या म्हणण्यानुसार सचिन वाझे यांची आतापर्यंतची चौकशी आणि तपासानंतर ही गोष्ट समोर आली आहे की या कटामध्ये सचिन वाझें यांच्या जवळचे काही पोलीस ऑफिसर यामध्ये सामील आहेत.

ब्रेकिंग : Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात 2800 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू

सध्याच्या चौकशीमध्ये नेते तसेच मुंबई पोलीस अधिकार्‍यांची कोणतीही भूमिका उघडकीस आली नाही. NIA सूत्रांचे म्हणणे असे आहे कि Antilia केसला त्यांनी जवळजवळ सोडवले आहे. कटासंबंधित एक एक कडी उघडत जात आहे. NIA सूत्रांचा दावा आहे की Antilia केसमागे कोणताही दहशतवादी कट नव्हता. Antilia कटाची संपूर्ण कथा अशी आहे.
ESIC Recruitment 2021, Sarkari Naukri : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 2.4 लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

25 फेब्रुवारीच्या रात्री सचिन वाझे स्वतः स्कॉर्पिओ चालवत होते. स्कॉर्पिओच्या मागे एक इनोव्हा होती. ही इनोव्हा मुंबई पोलिसांची होती. Antilia च्या बाहेर स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर सचिन वाझे स्कॉर्पिओमधून उतरले आणि इनोव्हामध्ये बसले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. NIA च्या सूत्रांनुसार PPE किटमध्ये जी व्यक्ती दिसत आहे ती कोणी दुसरी नसून सचिन वाझे आहेत. याचे पुरावे NIA कडे आहेत. खरतर हा कायद्याने संपूर्ण PPE किट नाही आहे. तो ओव्हर साईट कुरता आणि रुमाल आहे.
Coronavirus in Pune : पुणेकरांनो सावधान ! पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 75 जणांचा पत्ताच नाही

ही घटना घडण्यापूर्वी सचिन वाझे यांनी दोन कुर्ते खरेदी केले होते. जिथून हे कुर्ते खरेदी केले गेले तेथे NIA ची टीम पोहचली. यातील एक 25 फेब्रुवारीला रात्री सचिन वाझे यांनी परिधान केला होता. त्याच रात्री मुलुंड टोल नाक्याजवळ केरोसीन ऑईलने जाळले गेले आणि दुसरा ठाण्यात सचिन वाझे यांच्या घरातून जप्त केला गेला. हाच तो कुडता होता जो CCTV मध्ये त्या व्यक्तीने परिधान केला होता.

सचिन वाझे स्कॉर्पिओमधून खाली उतरले आणि इनोव्हामध्ये बसले होते, या इनोव्हाच्या ड्राइव्हरपर्यंत NIA टीम पोहचली. सुत्रांनुसार ड्राइव्हर NIA च्या ताब्यात आहे. इनोव्हा चालवणारा चालक मुंबई पोलीस फोर्समधील आहे. म्हणजेच तो व्यक्ती पोलीस आहे. ही गाडी मुंबई पोलीस ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या नागपाडाच्या रिपेअर डेपोमध्ये उभी होती. NIA च्या सूत्रांनुसार गुन्हे शाखेच्या कार्यालयातील काळ्या मर्सिडीजमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या बॉटल मिळाल्या होत्या, त्या पुरावे जाळण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
शासकीय वेतनाचा प्रश्न मार्गी ! विनाअनुदानित शिक्षकांचे पगार होणार दुप्पट, तर बिनपगारी शिक्षकांना मिळणार 11 हजार रुपये

NIA च्या माहितीनुसार सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन सोबत यापूर्वीच स्कॉर्पिओबद्दल वक्तव्य केले होते. सचिन वाझे यांनीच घटनेच्या एका आठवड्यापूर्वी मनसुख हिरेनला स्कॉर्पिओ त्यांच्याकडे देण्यास सांगितली. 17 फेब्रुवारीला स्कॉर्पिओचा ताबा घेतल्यानंतर सचिन वाझे यांनीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चोरीचा अहवाल लिहण्यास मनसुख हिरेन यांना सांगितला होता. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्टर्न एक्सप्रेस हाय वे च्या मार्गावर मनसुख हिरेनने स्कॉर्पिओ खराब करण्याची आणि चोरीची वार्ता दिली होती हे खरे नाही. ही कार इतरत्र देण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे हे मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययूमध्ये तैनात असल्याने त्यांना खात्री होती की Antilia बाहेर अशी संशयास्पद कार सापडल्यास त्यांच्याकडे अशा हाय प्रोफाइल प्रकरणात चौकशी दिली जाईल. कदाचित, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी जवळचा संबंध असल्याने त्यांनाही विश्वास होता. हेच कारण आहे की जेव्हा 25 फेब्रुवारीला Antilia बाहेर संशयास्पद कारची बातमी मिळाली तेव्हा एटीएसची टीमही तिथे पोहोचली होती.
पुणे महापालिकेकडून सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर

ATS चे एक DCP ही घटनास्थळी आले. सचिन वाझे आधीपासूनच घटनास्थळी हजर होते. त्यांनी एटीएसच्या DCP ला विचारले की तुम्ही अथवा तुमची टीम इथे काय करीत आहे, आमची टीम हि बाब हाताळेल. यावर जेव्हा एटीएसच्या DCP ने sachin vaze यांना विचारले की तुम्ही कोण आहात. एटीएसचे डीसीपी नुकतेच मुंबई पोलिसांकडे प्रतिनियुक्तीवर आले होते, sachin vaze साध्या कपड्यांमध्ये होते, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. यावर sachin vaze यांनी प्रत्युत्तर दिले आणि DCP ला म्हणाले माझे नाव सचिन वाझे.

त्यानंतर सकाळी Antilia प्रकरणाची चौकशी सचिन वाझे यांच्या हाती आली आणि या प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून तैनात करण्यात आले. आतापर्यंत हे संपूर्ण षडयंत्र योजनेंतर्गत चालू होते. सचिन वाझे यांना खात्री होती की हे प्रकरण सोडविल्यानंतर ते पुन्हा मुंबई पोलिसांकडे परत येतील आणि पुन्हा एकदा प्रकाशझोतात येतील. परंतू सचिन वाझे यांच्या काही चुका झाल्या आणि या चुकांमुळे या प्रकरणाचा तपास थेट NIA च्या ताब्यात गेला. हे प्रकरण त्यांच्या हातात येईल की नाही याचीही खात्री सचिन वाझे यांना नव्हती. तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्यानंतर सचिन वाझे हे पुरावे मिटवण्याच्या कामात सामील झाले आणि येथे ते एकामागून एक चुका करीत गेले.

अशा चुकांमुळे ते NIA च्या ताब्यात अडकले आणि बरीच विचारणा केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. या षड्यंत्राची माहिती NIA कडे आहे. या कटात सचिन वाझे यांचे उर्वरित मदतनीस पकडले पाहिजेत. यासंदर्भात गुन्हे शाखेशी संबंधित पाच पोलीस सध्या NIA च्या रडारवर आहेत. मात्र, मनसुख हिरेनची हत्या कोणी केली? हा प्रश्न कायम आहे. तसेच बरेच प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे NIA ला शोधावी लागतील.

ATS च्या हाती सापडले महत्वपूर्ण पुरावे

Antilia च्या केसमध्ये एटीएसच्या हाती महत्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. त्यानुसार निलंबित मुंबई पोलीस API सचिन वाझे कट रचत होते. याचा खुलासा करणारा एक सीसीटीव्ही फुटेज एटीएसला म्हणत्वपूर्ण पुरावा म्हणून सापडला आहे. त्या फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की 17 फेब्रुवारीला एपीआय सचिन वाझे आणि मनसुख हिरेन एकमेकांना भेटले होते. दोघे सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ मर्सिडीज कारमध्ये बसले आणि दहा मिनिटे चर्चा केली.

मुंबई पोलीस मुख्यालय सीएसटी रेल्वे स्थानकापासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे CIU युनिटचे कार्यालय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांनी दावा केला होता त्या दिवशी मुलुंड ऐरोली रोडवर त्यांची कार खराब झाली आहे. त्यांनी तिथे गाडी पार्क केली आणि ओला कॅब घेऊन कामासाठी दक्षिण मुंबईला गेला. झवेरी बाजारात आपले काही काम असल्याचे त्याने सांगितले.

मात्र, एटीएसने ओला चालकाचा जबाब घेतला आहे. ओला चालकाने एटीएसला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की मनसुखने त्यांना मुंबई पोलीस मुख्यालय-क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाण्यास सांगितले होते आणि CIU युनिटचे कार्यालय क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे. ओला चालकाने एटीएसला सांगितले होते की त्यांना मधेच काही कॉल आले होते आणि त्या व्यक्तीला ‘सर’ म्हणून संबोधित केले. एटीएसचा असा विश्वास आहे की कॉल करणारी व्यक्ती वाझे होती.

महाराष्ट्र शासनाचे आदेश जारी ! आता ऑफिसमध्ये फक्त 50 % उपस्थिती

त्यावेळी मनसुख हिरेन यांना 5 कॉल आले. तथापि, क्रॉफर्ड मार्केटजवळ मनसुखने ओला चालकास सीएसटी स्टेशन सिग्नलजवळ सोडण्यास सांगितले होते, तेथून मार्केटला जाणारी दुसरी बस दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.

एटीएसने सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातून अत्यंत महत्वाचे सीसीटीची फुटेज जप्त केले आहेत. ज्यामध्ये वाझे हे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातून बाहेर येणाऱ्या मर्सिडीज कारमध्ये दिसत आहेत. यानंतर वाझे पार्किंग लाईटसह सीएसटी स्टेशन सिग्नलजवळ दिसले आणि नंतर मनसुख हिरेन पायी चालत येऊन वाझे यांच्या कारमध्ये बसले.

त्यानंतर मर्सिडीज कार फिरून पुन्हा दहा मिनिटे तिथेच थांबते. त्यानंतर मनसुख गाडीतून खाली उतरतात आणि ती मर्सिडीज कार मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाताना दिसते. एटीएसला असा संशय आहे की त्याचवेळी हिरेनने स्कॉर्पिओ कारची चावी वाजे यांच्याकडे दिली आणि आपल्या सीआययू कर्मचाऱ्यांमार्फत ही गाडी विक्रोळीत पाठवण्याचा आदेश दिला आणि ठाण्यातील साकेत सोसायटीत पार्क केली, जिथे सचिन वाझे स्वतः राहतात.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांची स्कॉर्पिओ कार चोरीला गेल्याची तक्रार दिली. 25 फेब्रुवारीला तीच स्कॉर्पिओ कार antilia च्या बाहेर जिलेटीनने भरलेली उभी होती.

Read More…
शिवसेनेचा सामनामधून सवाल; ‘NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला ?’
परमबीर सिंह ‘नाराज’; नवीन पदभार न घेताच रजेवर
LIC ची 29 कोटी पॉलिसीधारकांना मोठी भेट ! सुरू केली ‘ही’ नवी सुविधा, ‘पॉलिसी होल्डर्स’ला असा मिळणार फायदा, जाणून घ्या
‘माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला DGP, मुंबई CP का केलं?; IPS पांडे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘सवाल’
दिलासादायक ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे होणार खिशावरचा भार कमी अन् पैशांचीही बचत
घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई