सांगली : आंबेगाव येथील कला केंद्रामध्ये गैरप्रकार, पोलिसांनी छापा टाकून १० जण घेतले ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील कला केंद्रामध्ये गैरप्रकार सुरू असल्यावरून या केंद्रावर कारवाई छापा टाकण्यात आला. यावेळी १० जणांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. याबाबत कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अतिरीक्त पोलिस अधीक्षक मनिषा डुबूले यानी डान्सबार सारख्या धर्तीवर चालणाऱ्या कला केंद्रावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना विटा कडेगाव रोडवर ‘महालक्ष्मी कला केंद्रा’त गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुुसार शनिवारी कलाकेंद्रावर छापा टाकण्यात आला. तेथे दोन खोल्यांमध्ये स्त्रीया ढोलकी व सुरपेटीच्या तालावर अश्लील व बीभत्स वर्तन करत नाचत असल्याचे व समोर ग्राहक म्हणून बसलेले व्यक्ती मद्यपान करत आरडाओरडा करून नृत्य करत होते.

कलाकेंद्राचे मालक अक्षय धनाजी शिंदे (वय २१) व धनाजी उत्तम शिंंदे (वय ४९ दोघेही रा. विटा) हे महिलांकरवी अश्लील नृत्य करवून घेत असल्याचे समोर आले. यावेळी सात महिला व ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली. यात ग्राहक म्हणून आलेल्या विजय महादेव रोडे (वय ३८,रा. लाडेगाव), प्रणव प्रभाकर पाटील (वय २७ रा. लाडेगाव), अतुल नामदेव पाटील (वय ३०, रा. घाटनांद्रे), प्रशांत बाबसाहेब पवार (रा. घाटनांद्रे), सुधीर यशवंत कदम (वय ३५, रा. खानापूर), प्रविण विलास शितोळे (रा. विटा), आकाश व्यकंटेश माळी (वय २८, सातारा), किरण रमेश सोनटक्के (वय २९ रा. कोल्हापूर) तसेच ढोलकी व सुरपेटी वादक शिवाजी पोपट लाखे (रा. इस्लामपूर), रंगराव महादेव लाखे (रा. कराड) यांना ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त