Visa संपल्यानंतर तरुणी बनल्या ‘कॉलगर्ल’, पोलिसांनी पकडलं ‘या’ अवस्थेत

भोपाळ : वृत्तसंस्था – टुरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तीन तरुणींना भोपाळ गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तरुणींचा टुरिस्ट व्हिजाची मुदत संपल्यानंतर देखील त्या भारतात वास्तव्य करत होत्या. या तरुणींना आणि त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करणाऱ्या तीन तरुणांना भोपाळ गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दारुच्या बाटल्या आणि काही अक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

भोपाळ गुन्हे शाखेने बीडीए कॉलनीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी तीन परदेशी तरुणी सुयोग आणि कपील नावाच्या तरुणांसोबत अश्लिल चाळे करताना आढळून आल्या. या ठिकाणी जॉन मसीह हा व्यक्ती सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये पकडण्यात आलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी नेपाळ तर दोन तरुणी उझबेकिस्तानच्या आहे. या तरुणी टुरिस्ट व्हिजावर भारतात आल्या होत्या. मात्र, व्हिजाची मुदत संपल्यानंतर त्यांनी परत जाण्याऐवजी भारतात बस्तान मांडले होते. त्यांच्या व्हिजाची मुदत २०१८ पर्यंत होती. मुदत संपल्यानंतर देखील त्या भारतात राहून कॉलगर्लचे काम करत असल्याची माहिती भोपाळ गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या तरुणींनी आपला व्हिजा संपल्यानंतर देखील त्याची मुदत वाढवून घेतली नाही. त्यामुळे या तरुणींना ४०० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या एका तरुणीने दंडाची रक्कम भरली असून त्या तरुणीचे काही दिवसांनी लग्न होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

पोलिसांनी छाप्यामध्ये जप्त केलेल्या आरोपींच्या कागदपत्रांची छाननी केली. या छाननीमध्ये कॉल गर्लच्या पासपोर्टवर त्यांचे खरे नाव आहे. मात्र, मतदान ओळख पत्रावर त्यांचे खोटे नाव असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांचे फोटो खरे असून पोलीस त्याचा तपास करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like