Police Commemoration Day | पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Police Commemoration Day | मागील वर्षभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Police Commemoration Day)

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट वाइस एडमिरल अजय कोच्छर (एव्हिएसएमएनएम) पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, बिनतारी संदेश विभाग पुणेचे पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत, राजेंद्र सिंग व अति पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांनी यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. (Police Commemoration Day)

यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमीचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, कारागृह पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रविणकुमार पाटील, अरविंद चावरिया, वसंत परदेशी, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, एसआरपी पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

लडाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्वतयारीनिशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शुरवीरांनी शत्रुशी निकराने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस दलावच्यावतीने पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतीदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाच्या कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात येते.

गेल्या वर्षभरात १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील सहा.पो.निरी. सुदर्शन भिकाजी दातीर,
पो. हवा. गौरव नथुजी खरवडे, पो. हवा. जयंत विष्णुजी शेरेकर, पो. हवा. विठ्ठल एकनाथ बढ़ने, पो.ना. संजय रंगराव नेटके,पो.ना. अजय बाजीराव चौधरी असे एकूण ६ पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. शोक कवायतीचे आयोजन करून या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

शोक कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाय, पुणे लोहमार्ग पोलीस,
व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २ यांचेकडील प्रत्येकी एक प्लाटुनने सहभाग घेतला.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील बॅण्डपथकानेही यात सहभाग घेतला.
परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हटकर व सेकंड परेड कमांडर, राखीव पोलीस उप-निरीक्षक विठ्ठल मांढरे
यांनी परेड कवायतीचे नेतृत्व केले.

वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकूण १८८ जवानांच्या
नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान सहा. पोलीस आयुक्त आरती बनसोडे आणि नंदिनी वाग्यानी यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil on Narayan Rane | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आपले आजोबा-पणजोबा…’

Pune Police MPDA Action | पुणे पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अवघ्या 10 महिन्यात 50 जणांवर MPDA

Lok Sabha Elections | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची पेरणी सुरु, दिवाळी आणि होळीला मिळणार मोफत गॅस सिलेंडर