Lok Sabha Elections | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची पेरणी सुरु, दिवाळी आणि होळीला मिळणार मोफत गॅस सिलेंडर

मुंबई : Lok Sabha Elections | मागील पाच-सहा वर्ष सुमारे एक हजार ते साडे अकराशे रूपयाला सिलेंडर खरेदी करून ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच मोदी सरकारने दोन महिन्यापूर्वी सिलेंडरची किंमत दोनशे रूपयांनी कमी केली. आता निवडणुक जवळ येऊ लागल्याने वर्षभरात दिवाळी आणि होळी असे दोनवेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना येत्या काही महिन्यात पुढे येऊ शकते. याची सुरुवात उत्तर प्रदेशमधून होऊ शकते. भाजपाची ही निवडणुकीपूर्वीची पेरणी असल्याचे म्हटले जात आहे. (Lok Sabha Elections)

भडकलेले पेट्रोल-डिझेलचे दर, न परवडणारा सिलेंडर, अशा महागाईच्या मुद्द्याचे राजकारण करून मोदी सरकार २०१४ ला सत्तेत आले. पण त्यानंतर महागाईने अशरक्षा कळस गाठला. आज पेट्रोल शंभरीच्या पुढे गेलेय, सिलेंडर दोन महिन्यांपूर्वी हजारच्या पुढे होता. वीज, पाणी, दवाखाना यासह खाद्यतेल, भाज्या, किराणा, कपडे सर्वच प्रचंड महागले आहे. या महागाईवरून लोकांमध्ये रोष आहे. (Lok Sabha Elections)

त्यातच लोकसभा निवडणूक जवळ आल्याने या महागाईचा परिणाम निकालावर होऊ नये यासाठी, भाजपाने हळुहळु पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दोनच महिन्यापूर्वी सिलेंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी करून महिला वर्गाला भाजपाने खुश केले. आता वर्षाला दोन सिलेंडर दिवाळी आणि होळीला मोफत देण्याची घोषणा देखील केली जाण्याची शक्यता आहे. याची सुरूवात उत्तर प्रदेशातून होणार आहे.

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. हे राज्य जो जिंकतो त्याला देशात सहज सत्ता मिळवता येते.
येथून ७२ खासदार निवडूण जातात. म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने वर्षाला दोन सिलेंडर मोफत देण्याची
तयारी सुरु केली आहे. या दिवाळीपासून दर दिवाळी आणि होळीला हा गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये या योजनेचे १.७५ कोटी लाभार्थी आहेत.

भाजपा नारी शक्ती वंदन कायद्यांतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी परिषद आयोजित करणार आहे.
तत्पूर्वी पक्षाचे सरचिटणीस संघटना धर्मपाल सिंह यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना हा मुद्दा जनतेसमोर ठेवण्यास सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मित्राच्या जामिनासाठी ठाण्यातून अट्टल सोनसाखळी चोरांना बोलावलं ! मुख्य सुत्रधारास अटक करून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश

Maharashtra Political News | भाजपाच्या महिला खासदाराची नाराजी, म्हणाल्या – ‘फक्त आडनावामुळे डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर…’