पोलिस कर्मचाऱ्याकडून धावत्या रेल्वेच्या बाथरूममध्ये महिला कैद्यावर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील तिहार जेलमधील एका महिलेला पश्चिम बंगालला घेऊन जात असताना पोलीस कॉन्स्टेबलद्वारे ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक केसच्या संधर्भात महिलेला पश्चिम बंगालला घेऊन जात असताना पोलीस कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीच्या लोकल रेल्वे स्टेशन मध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नंदन कानन एक्सप्रेसमध्ये घडली घटना

आरोपी कॉन्स्टेबल हा दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र पोलीस (DAP) चा सदस्य आहे, जी दिल्ली पोलिसांचीच एक विंग आहे. महिलेच्या सुनवाईसाठी तिला पश्चिम बंगालला नेण्यात आलं होत त्या दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये कॉन्स्टेबलकडून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

महिलेने याबाबत तिहार जेलच्या डॉक्टरांना सांगताच डॉक्टरांनी तात्काळ पश्चिम दिल्लीच्या सरकारी दवाखान्यात पाठविले. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महिला कर्मचारी मला टॉयलेटसाठी घेऊन जात होत्या मात्र प्रमुख कॉन्स्टेबलने येऊन त्या महिलांना जागेवर जाण्यास सांगितले आणि त्यानंतर टॉयलेटमधे जाऊन त्या महिलेवर बलात्कार केला.

महिलेने दिल्ली पोलिसांवर असे आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे याआधी सुद्धा एका हेडकॉन्स्टेबलच्या घरात काम करणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने तत्काळ या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली आयुक्तांकडे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like