पोलीस हवालदाराची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत (वय ४५) यांनी काल रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वारगेट पोलीस लाईन बिल्डिंग नंबर ६ येथे काल रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला.

[amazon_link asins=’B07F5YKHL2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2c07769-9b85-11e8-84e7-8784fbc81698′]

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश राऊत हे स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये राहतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी गुजरात येथे असतो. डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे कोर्ट ड्युटीचे काम होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ते घरी आले. त्यानंतर पती पत्नीत भांडणे झाली. पत्नी वरांड्यात गेली असताना उमेश राऊत यांनी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. तरीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी दरवाजा उघडल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

राऊत हे  नेहमीप्रमाणे काल सकाळी ते पोलीस ठाण्यात आले होते. सर्वांशी हसून गप्पा मारत ते कोर्टात गेले होते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यावर कोणता तणाव असल्याचे कधी जाणवले नाही, असे डेक्कन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.