पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलिस क्रेडिट सोसायटीची मदत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी द्यायला हवा. सामाजिक संस्थांबरोबरच सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सामाजिक भावना अशीच कायम राहिली आहे. समाजात सामाजिक भावना राहिल्यास अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. पोलीस मुख्यालय येथील पोलीस क्रेडिट सोसायटीने नेहमीच आपल्या कार्यकुशलतेने नेहमीच सामाजिक भावना जपली आहे. त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीसप्रमुख ईशू सिंधू यांनी केले.

पोलिस मुख्यालय येथील पोलिस क्रेडिट सोसायटीच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सोसायटीचे चेअरमन राजू सुद्रिक यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सिंधू यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्हा. चेअरमन सुमन दिघोळे, संचालक संजय चोरडिया, राजू वैरागर, दिनेश मोरे, अंजली बर्डे, लक्ष्मण खोकले*ट, प्रकाश पाठक, भाऊसाहेब निमसे, सचिन शिरसाठ, बाळासाहेब कणगरे, सतीश भांड, दीपा आठवले, प्रसाद आळकुटे आदी उपस्थित होते.

चेअरमन राजू सुद्रिक म्हणाले की, विविध वस्तू, अन्नधान्य व खाण्यापिण्यासाठीची मदत पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. त्यामुळेच आम्ही सोसायटीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी निर्णय घेऊन रोख मदत देण्याचे ठरविले. त्यानुसार मदतीचा धनादेश जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला, असे ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त