अहमदनगर : ‘सेल्फी’ काढणाऱ्यांना लावले हुसकावून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुळा धरणावर आलेल्या पर्यटकांमधील काही जण मुळा धरणाच्या भिंतीवर गेल्याने पाटबंधारे खात्याची धावपळ उडाली. पोलिसांनी भिंतीवर उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.

रविवार असल्यामुळे काल मुळा धरणाकडे पर्यटकांची रीघ लागली होती. प्रवेशव्दारावर असलेल्या पोलीस चौकीतून पास दाखविल्याशिवाय आत सोडले जात नव्हते. पर्यटक आत सोडा म्हणून पोलिसांना विनवणी करीत असल्याचे चित्र समोर आले. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घातली. मुळा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली होती. पर्यटक मो-यावर असलेल्या रस्त्यावरून वावरत होते. पर्यटक दरवाजाच्यावर असलेल्या कळ दाबण्याच्या चेंबरजवळ जाऊन सेल्फी काढू लागले. या घटनेची माहिती घेतात पोलिसांनी तातडीने भिंतीकडे धाव घेतली व पर्यटकांना हुसकावून लावले.

मुळा धरण परिसरात पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like