डॉ. शीतल आमटे यांचे शेवटचे ‘चॅटींग-संवाद’ कुणाशी ?, ‘हा’ पासवर्ड ठेवल्याने वाढल्या अडचणी, सायबर सेल घेणार तज्ज्ञांची मदत

चंद्रपूरः पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. शीतल आमटे- करजगी यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कमालीची गुप्पता बाळगली आहे. दुसरीकडे आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल यांनी केेलेली चॅटींग या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरवताना महत्वाची ठरणार आहे. पोलिसांनी जप्त केलेले लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल मुंबईच्या सायबर सेलकडे पाठवला आहे. परंतू या गॅझेटचा पासवर्ड काही दिवसापूर्वी बदलला होता. पासवर्ड डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे ठेवले होते. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सायबर सेल आता तज्ज्ञांची मदत घेत आहेत.

महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. कुटुंबातील जबाब, शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यातील कडी जोडली जाईल, त्यानंतर यावर बोलणे योग्य राहिल अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांनी आज आनंदवनात जाऊन पुन्हा चौकशी केली. परंतू याचा तपशील सांगण्यास त्यानी नकार दिला. डॉ. शीतल यांनी आत्महत्येसाठी कोणते औषध वापरले होते. हे फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, तोवर यावर भाष्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. डॉ. शीतल आत्महत्येपूर्वी कुणाशी संवाद साधला,चॅटींग केले हे तपासात महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सायबर सेलच्या अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा आहे. त्यानंतर या प्रकरणातील महत्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.