पोलिस नाईक स्वप्निल मोरे यांचा ‘बहिर्जी नाईक’हा पुरस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे ग्रामीण पोलिस दलातील गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलिस नाईक स्वप्निल मोरे यांचा ‘बहिर्जी नाईक’हा पुरस्कार पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते देउन गौरव करण्यात आला.

पोलिस दलाचे कान,नाक अन डोळे असे म्हणुन संबोधले जाणारा विभाग म्हणजे गोपनीय विभाग.या विभागातुन जिल्हयातील घडणा-या प्रत्येक घटना व हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. पोलिस नाईक स्वप्निल मोरे यांनी कोरेगाव भिमा बंदोबस्त अनुशंगाने जिल्हयात गोपनीय खात्यात उत्कृष्ट कार्य केले.त्यांच्या याच कार्याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी मोरे यांना ‘बहिर्जी नाईक’हा पुरस्कार देउन गौरव करण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलिस दलाची सुञे नवनियुक्त पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी हाती घेताच पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपञक व पुरस्कार देउन कामातील आलेख वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचा नवा पायंडा पाडला आहे.त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.