Police Officer Transfers | यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

घाटंजी (यवतमाळ) : Police Officer Transfers | यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक (PI) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) यांच्या बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहे. (Police Officer Transfers )

यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – 1951 मधील कलम 22 (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील नमुद पोलिस अधिकारी, त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहेत. सदरच्या बदल्या व नेमणूका यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड (SUPERINTENDENT OF POLICE DR. PAVAN BANSOD) यांनी केल्या आहे.

पोलिस निरीक्षक प्रशांत जानराव कावरे पोलिस स्टेशन सायबर क्राईम यवतमाळ वरुन ग्रामीण पोलिस स्टेशन यवतमाळ,
पोलिस निरीक्षक नंदकिशोर मनोहरराव पंत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यवतमाळ वरुन पोलिस स्टेशन वसंतनगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बापुराव नरसाळे पोलिस स्टेशन पांढरकवडा वरुन पोलिस स्टेशन पारवा
व सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील पोलिस स्टेशन वसंतनगर वरुन
पोलिस स्टेशन खंडाळा येथे नेमणूक करण्यात आली आहे. बदली व नेमणूका झालेले पोलिस निरीक्षक
(POLICE INSPECTOR) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (ASSISTANT POLICE INSPECTOR) यांना नेमणूकीचे
ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड
(SUPERINTENDENT OF POLICE DR. PAVAN BANSOD) यांनी दिले आहे.
आदेशाच्या प्रति अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, पोलिस अधीक्षक (मुख्यालय) यवतमाळ,
उप विभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ, उप विभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा, उप विभागीय पोलिस
अधिकारी पुसद, पोलिस नियंत्रण कक्ष व संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gangster Hemant Dabhekar Meet Srikant Shinde | गँगस्टर शरद मोहोळचा राइट हॅन्ड पोहोचला ‘वर्षा’वर, कुख्यात गँगस्टरने घेतील खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

Pune Police PSI Suspended | पुणे विद्यापीठातील ललित केंद्रामध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

पुणे : मॅट्रिमोनी साइटवरील ओळख तरुणीला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

पुण्यात नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी चुलत्याला अटक