Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन ऑनलाइन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करुन 3 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली असून 11 जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी गेम पार्लर चालक मालक पियुष धर्मेंद्र राय (वय-22 रा. केशवनगर, चिखली मुळ रा. बिहार), सुखकर्ता गेम पार्लर चालक कामगार अक्षय ज्ञानदेव माने (वय-21 रा. अजिंठानगर, निगडी), राजश्री गेम्स पार्लर चालक कामगार शशांक अनिल केशरवाणी (वय-29 रा. अमृता मठाजवळ, यमुनानगर, निगडी) यांच्यासह 11 जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली येथील साने चौकातील कृष्ण कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या तीन गाळ्यांमध्ये ऑनलाईन व्हिडीओ गेम्स पार्लमध्ये अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुखकर्ता व्हिडीओ पार्लर अॅण्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर, राजश्री व्हिडीओ गेम पार्लर आणि बालाजी व्हिडीओ गेम पार्लर या ठिकाणी छापा टाकला.पोलिसांनी तीन गेम्स पार्लरवर छापा टाकून 53 हजार 520 रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 56 हजार रुपये किमतीचे व्हिडीओ गेम खेळण्याचे बॉक्स, 33 हजार 400 रुपयांचे एलईडी, 72 हजार 800 रुपयांचे मोबाइल असा एकूण 3 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार संतोष असवले, संदिप गवारी, पोलीस नाईक भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, पोलीस शिपाई योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.