Alandi News : कल्याण जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा, 10 जणांवर FIR

आळंदी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंद्रीयणी नदीकाठी असलेल्या एका पडीक शेतात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार आड्डयावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. या करवाईत पोलिसांनी दहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लाख 5 हजार 917 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कॅशिअर राजेश्वर किसनराव पाटील (वय-49 रा. आदर्शनगर, दिघी), रायटर रामहरी पांडूरंग गणगे (वय-51 रा. काळे कॉलनी, आळंदी), सोनू हिरालाल पाटील (वय-23 रा. इंद्रायणीनगर, आळंदी), पांडुरंग भवान मतकर (वय-37 रा. वडगाव रोड, आळंदी), बालाजी रमेस बिडगर (वय-37 रा. काळे कॉलनी, आळंदी), खेळी अनिल बाळासाहेब मुंडे (वय-28 रा.हिंदवी कॉलनी, आळंदी), बाळू नामदेव नेवाळे (वय-45 रा. नेवाळे वस्ती, चिखलीगाव), मलकु पाटील (रा. एमआयटी कॉलनी जवळ, कोथरुड, पुणे), मटका चालक-मालक शहा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी राहुल तापकीर यांच्या पडीक शेतात कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी 27 हजार 900 रुपयांची रोकड, 28 हजारांचे 6 मोबाईल, पेन, 50 हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 5 हजार 917 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मटका अड्डा चालवणारा शहा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. इतर आरोपींना सीआरपीसी 41 (अ) नुसार नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.