हिंजवडी परिसरातील ‘या’ 19 हॉटेल, बिअर शॉपी, हुक्काबार, रेस्टॉरंटवर पोलिसांकडून कारवाई, केले सीलबंद

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा संक्रमण वाढ असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन करुन हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार सुरु ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.25) कारवाई करुन 19 अस्थापना सिल केल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोचा संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकाांच्या आरोग्य व जिवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करुन हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार सुरु ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी आज कारवाई करुन हॉटेल, हुक्काबार, रेस्टॉरंट, चायनीज यासह 19 अस्थापना सिल करुन गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल, बिअर शॉपी, रेस्टॉरंट सिल

हॉटेल व्यावसायिकांना ऑनलाईन घरपोच सेवा देण्याची परवानगी असताना कारावाई करण्यात आलेल्या हॉटले, रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी त्यांच्यावर करवाई करण्यासाठी तीन पथके नेमली होती. या पथकांनी हिंजवडी-माण, पुणे बेंलोर हायवे, बावधन परिसरातील हॉटले, बिअर शॉपी, रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई केली. हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी सूचना देऊन देखील हॉटेल, हुक्काबार सुरु असल्याने मुळसी तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. तहसिलदारांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक साळूंके, खडके, मुदळ, काकडे, यलमार, पोलीस हवालदार पराळे, पोलीस नाईक मोहिते, मोहोळ, घाडगे, जाधव, पोलिस शिपाई पवार, पांढरे, शेख यांच्या पथकाने केली.

कारवाई करण्यात आलेले हॉटेल, बिअर शॉपी, रेस्टॉरंट, चायनिज सेंटर

1. मोफोसा हॉटेल, ऑक्सफर्ड रोड, खंडोबा मंदीर जवळ, बावधन

2. हॉटेल रुडलाऊंज ( हिंजवडी)

3. हॉटेल ठेका रेस्टो लॉज, श्रद्धा इन्कली, भुमकर चौक ते हिंजवडी रोड, हिंजवडी

4. हॉटेल अशोका बार अँड रेस्टो, जयरामनगर, शिवाजी चौक, हिंजवडी

5. हॉटेल बॉटमअप, भटेवार नगर, हिंजवडी

6. श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट, माण

7. महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज बुचडेवस्ती, मारुंजी

8. हॉटेल शिवराज, पुनावळे

9. कविता चायनिज सेंटर, शिवार वस्ती, मारुंजी

10. हॉटेल पुणेरी, बावधन

11. हॉटेल आस्वाद, इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी

12. हॉटेल ग्रिनपार्क स्टॉट ऑन, भुंडे वस्ती, बावधन

13. फॉर्च्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल, व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी

14. हॉटेल टिमो, चांदणी चौक, बावधन

15. वॉटर-9 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच, बावधन खुर्द, पौड रोड, जुना जकात नाका, बावधन

16. एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट, हिंजवडी ते कासारसाई रोड, कासारसाई

17. योगी हॉटेल, पुणे बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे

18. यश करण बिअर शॉपी, हिंजवडी