Police Sports Competition | यंदाच्या पोलीस दलाच्या स्पर्धेचा मान पुण्याला, देशातील 2 हजार 639 स्पर्धकांचा सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Sports Competition | नवी दिल्ली येथील भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाकडून (All India Police Sports Control Board) घेण्यात येणाऱ्या 71 व्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध पोलीस दलांमार्फत या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धांचा (Police Sports Competition) मान पुण्याला (Pune Police) मिळाला असून भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा (Indian Police Wrestling Cluster Tournament) हडपसर टेमटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) क्रीडासंकुलात होणार आहेत. या स्पर्धा 20 नोव्हेंबर पर्य़ंत सुरु राहणार आहेत.

 

यंदाच्या स्पर्धांचा मान पुण्याला मिळाला असून या स्पर्धेचा (Police Sports Competition) प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत कुस्ती (Wrestling), कबड्डी (Kabaddi), मुष्टीयुद्ध (Boxing), पॉवरलिफ्टिंग (Powerlifting) आणि शरीरसौष्ठव (Bodybuilding) आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये 27 राज्य आणि 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस विभागाचे (Central Armed Police) संघ,
केंद्रशासित प्रदेशांचे संघ असे एकूण 37 संघ सहभागी होणार आहेत. 1596 पुरुष आणि 632 महिला खेळाडू,
प्रशिक्षक, सहायक असे एकूण 2 हजार 639 स्पर्धक यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राज्य राखीव पोलीस दलाचे पुणे परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक दीपक साकोरे (SRPF Deputy IGP Deepak Sakore) आणि राज्य राखीव पोलीस दल गट एकचे समादेशक प्रवीण पाटील (Praveen Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेत विविध राज्यातील तसेच केंद्रीय पोलीस दलातील अर्जुन पुरस्कारप्राप्त (Arjuna Award),
हिंद केसरी (Hind Kesari), महाराष्ट्र केसरी स्पर्धक (Maharashtra Kesari) सहभागी होणार आहेत.
यामध्ये गौरव सिंग (Gaurav Singh), राहुल आवारे (Rahul Aware), नरसिंह यादव (Narsingh Yadav),
विजय चौधरी (Vijay Chaudhary), नवीन मोर (Naveen Mor), मौसम खत्री (Mausam Khatri),
निर्मला देवी (Nirmala Devi), गुरुशरण कौर (Gurusharan Kaur), सुभाष पुजारी (Subhash Pujari), हरप्रीत सिंह (Harpreet Singh) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Police Sports Competition | organized 71st all india police wrestling cluster tournament at state rakhiv police force sports complex hadapsar ramtekdi srpf ground

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल