Police Sports Competition | पुण्यातील बॉडीबिल्डिंग स्पर्धेत PSI सचिन शिंदेंची ‘सुवर्ण’ कामगिरी, सलग तिसऱ्यांदा पटकावले ‘सुवर्णपदक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Sports Competition | नवी दिल्ली येथील भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाकडून (All India Police Sports Control Board) घेण्यात येणाऱ्या 71 व्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध पोलीस दलांमार्फत या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धांचा (Police Sports Competition) मान पुण्याला (Pune Police) मिळाला असून भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा (Indian Police Wrestling Cluster Tournament) हडपसर रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) क्रीडासंकुलात होत आहेत.

 

 

चेंबूर आरसीएफ पोलीस ठाण्यातील (Chembur RCF Police Station) पोलीस उपनिरीक्षक सचिन गणपत शिंदे (PSI Sachin Ganpat Shinde) यांनी पुण्यात झालेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत (Bodybuilding Competition) सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. शिंदे यांनी 70 किलो वजनी गटामध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीकारी बाळासाहेब गावटे (Balasaheb Gavate) यांनी दिली. गावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी एसआरपीएफ ग्रुप, वानवडी पुणे (Police Sports Competition) येथे आयोजित करण्यात आलेल्या 71 व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर स्पर्धेमध्ये सचिन शिंदे यांनी 70 किलो वजनी गटात सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

सचिन शिंदे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये नाशिक येथे झालेल्या पोलीस खात्यातील बॉडीबिल्डींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यासाठी बॉडीबिल्डिंग खेळण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये जयपुर राजस्थान येथे झालेल्या
ऑल इंडिया रेसलिंग क्लस्टर स्पर्धेत 70 किलो वजनी गटात पहिले सुवर्णपदक जिंकले.
त्यानंतर 2020 मध्ये हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेत दुसरे सुवर्णपद जिंकले. 2021 मध्ये कोरोना संकटामुळे स्पर्धा झाल्या नाहित.
त्यानंतर 2022 मध्ये पुणे येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तीसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
याशिवाय 2019 आणि 2022 मध्ये तेलंगणा येथे झालेल्या ‘भारत श्री’ स्पर्धेत भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व केले.
सचिन शिंदे यांची लुधियाना येथे होणाऱ्या ‘Mr. India’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

Web Title :- Police Sports Competition | PSI Sachin Shinde’s ‘golden’ performance
in bodybuilding competition in Pune, won the ‘gold medal’ for the third time in a row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा