MP Amol Kolhe | ‘छत्रपती शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय?’, खा. अमोल कोल्हेंचा भाजपला सवाल (व्हिडिओ)

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते (BJP National Spokesperson) सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. भाजपला छत्रपती शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय? असा सवाल खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केला आहे.

 

ADV

 

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी दिल्लीत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत, असे त्रिवेदी यांनी म्हटले होते. सोशल मीडियावर या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमोल कोल्हे म्हणतात, सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य ऐकले आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमके खुपतेय काय यांना? कधी भाजपचे प्रवक्ते बोलतात, तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य महाराजांबद्दल का केली जातात? भाजपला शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय? माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, हे शिवरायांनी अधोरेखित केले ते भाजपला खुपते का? अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी केली आहे.

 

Web Title :- MP Amol Kolhe | amol kolhe reaction on bjp sudhanshu trivedi
offensive statement of shivaji maharaj maharashtra political news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा