
Ajit Pawar | राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, तर…; अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Swatantryaveer Savarkar) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांकडून राज्यपाल आणि भाजपवर (BJP) टीका केली जात आहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करुन राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 20, 2022
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षाहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 20, 2022
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील, असे अजित पवार म्हणाले. तसेच राज्यपाल अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. असे म्हणत राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवारांनी केली.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 20, 2022
काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आणचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू (Jawaharlal Nehru) चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी (Mahatma Gandhi) चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींची नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत.
मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून (Dr. Babasaheb Ambedkar)
डॉ. नितीन गडकरींपर्यंत (Dr. Nitin Gadkari) सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.
Web Title :- Ajit Pawar | if maharashtra is not understood even after three years
ajit pawar took notice of the governors statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- MP Amol Kolhe | ‘छत्रपती शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय?’, खा. अमोल कोल्हेंचा भाजपला सवाल (व्हिडिओ)
- Ajit Pawar | अन्यथा महाविकास आघाडीत फूट पडेल, संजय राऊतांच्या या विधानावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘जो पर्यंत…’
- CM Eknath Shinde | पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे