Police Suspended | विषारी दारुमुळे 10 लोकांचा मृत्यू; 9 पोलीस तडकाफडकी निलंबित

आग्रा : वृत्तसंस्था – Police Suspended | आग्रामध्ये विषारी दारु (toxic alcohol) पिल्यामुळे 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबित (9 police suspended) करण्यात आले. विषारी दारुचे सेवन केल्यामुळे चार जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर इतर सहा जणांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

कथित विषारी दारुच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात 6 पोलीस हवालदार (police constables) आणि 3 ठाणे अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच दोषी सीमा शुल्क अधिकारी (Customs officer) आणि पोलिसांवर कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती आग्र्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजील कृष्ण (Additional Director General of Police Rajil Krishna) यांनी सांगितले.

विषारी दारु पिल्याने मृत्यू झालेल्या 10 पैकी चार जणांची फॉरेन्सिक लॅबमध्ये (forensic lab)
तपासणी करण्यात आली. त्यावेळी चौघांच्या शरीरामध्ये मिथाईल अल्कहोलचे (methyl alcohol) अंश सापडले आहेत. त्यामुळे या चौघांचा मृत्यू विषारी दारुच्या सेवनामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाल्याचे देखील अतिरिक्त पोलीस महासंचालक राजील कृष्ण यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

E-Sharam Portal | खुशखबर ! 38 कोटी लोकांसाठी मोदी सरकारने लाँच केले ई-श्रम पोर्टल, जाणून घ्या काय आहे ते आणि त्याचे फायदे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Police Suspended | 10 killed by toxic alcohol 9 police suspended in agra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update