Police Suspended | कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित, तर सहायक पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suspended | गोवंश रक्षकांनी एका स्विफ्ट कारमधील दोघांना बेदम मारहाण (Beating) केल्यामुळे एकाचा मृत्यू (Death) झाला होता. या प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणून घाटी पोलीस ठाण्यातील (Ghati Police Station) तीन पोलिसांना निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. तर सहायक पोलीस निरीक्षकाची (API) नाशिक येथील नियंत्रण कक्षात (Nashik Control Room) बदली (Transferred) करण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.24) घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी येथे घडला होता.

बिपीन जगताप (Bipin Jagtap), भास्कर शेळके (Bhaskar Shelke), किसन चवरे (Kisan Chawre) असे निलंबित (Police Suspended) करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. तर सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास (API Shraddha Gandhas) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात (Nashik Police) खळबळ उडाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील सिन्नर घोटी मार्गावरील (Sinner Ghoti Road) गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरुन 15 ते 20 गोवंश रक्षकांनी मिळुन दोघांना बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ शनिवारी (दि.24) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सिन्नरहुन मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारी स्विफ्ट कार (MH 02 BJ 6525) अडवण्यात आली.

कारमधील दोघांना 15-20 जणांच्या जमावाकडून लोखंडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाटी पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले. तर एपीआय श्रद्धा गंधास यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

Web Title :  Police Suspended | nashik three policemen from ghoti police station suspended for dereliction of duty

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Maharashtra Cabinet Decision | वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Actress Sonnalli Seygall | अभिनेत्री सोनाली सेहगल मालदीवमध्ये एन्जॉय करतीये हनीमून; फोटो केले पोस्ट