मुलींची टिंगल करणाऱ्या रोड रोमियोंना पोलिसांचा हिसका

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन – शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींची टिंगल टवाळी करणाऱ्या ४० रोड रोमियोंवर वाकड पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.

आज सकाळी साडेबारा वाजता सुटणाऱ्या शाळा व कॉलेज येथे मुलींची टिंगल टवाळी करणाऱ्या सुमारे 40 रोड रोमियो व त्यांचे जवळ असणाऱ्या 10 दुचाकी वाहनांवर महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. वाकड पोलिस स्टेशन हद्दीतील असणाऱ्या शाळा कॉलेज येथे शाळा भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या.

तसेच पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड त्यांनीसुद्धा अशा कारवाईवर भर द्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एम. एम. स्कूल थेरगाव, एस. एन. बी.पी., महर्षी विद्या मंदिर थेरगाव, बालाजी कॉलेज ताथवडे खिंवसरा स्कूल या ठिकाणी वाकड पोलिसांनी कारवाई केली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी, नारायण सस्ते, पोलीस उप निरीक्षक अमित शेटे व पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली.

You might also like