‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी किरण बेदी यांच्या नातीचा जबाब नोंदवून घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुद्दुचेरीच्या राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नातीचं अपहरण केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती तिच्या आईला न सांगता आपल्या वडीलांकडे असल्याचा व्हिडीओदेखील तिने फेसबुकवर अपलोड केला होता. परंतु पोलिसांनी तिला वडीलांकडून पुण्यात आणून तिचा जबाब नोंदवून घेतला आहे.

किरण बेदी यांची मुलगी साईना भरुचा पुण्यात आपल्या अकरा वर्षीय मुलगी मेहेरसह राहते. दरम्यान काही दिवसांपासून ती लोहगाव विमानतळ परिसरातील झिरकॉन को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये  नृत्याचे प्रशिक्षण घेते. दरम्यान ती तेथेच नृत्य शिक्षिकेसोबत राहात होती. त्यावेळी साईना यांनी तिची चौकशी करण्यासाठी फोन केला. मात्र तिचा फोन बंद होता. त्यामुळे त्या स्वत: तिला भेटण्यासाठी तेथे गेल्या. त्यावेळी मुलगी तेथे नव्हती. त्यामुळे त्यांनी तात्काळ मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान तिने सोशल मिडीयावर आपण वडीलांसोबत सुखरुप असल्याचा व्हीडीओ टाकला होता. वडीलांना त्रास दिला जात असून त्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे तिने त्यात म्हटले होते. किरण बेदी यांची नात असल्याचे सांगायला आपल्याला लाज वाटते असेही ती व्हीडीओत म्हणाली होती. त्यानंतर पोलिसही या कौटुंबिक प्रकरणात नेमकी काय भूमीका घ्यावी या चिंतेत होते. दरम्यान पुणे पोलिसांनी तिला तिच्या वडीलांकडून घेऊन येत जबाब नोंदवून घेतला आहे. असे पोलिसांनी सांगितले.