विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भिंगार हायस्कूल परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या तीन रोडरोमियोंना पोलिसांनी पकडले. ते रोडरोमिओ अल्पवयीन असल्याने समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

भिंगार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रविण पाटील यांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता भिंगार कॅम्प पोलीस ठाणे अंतर्गत रोडरोमीयोंचा बंदोबस्त करण्यासाठी पथक तयार केले आहे. त्या पथकाने आज भिंगार हायस्कूल येथे गेटवर शाळकरी मुलींना त्रास देणारे टवाळखोर तीन रोडरोमीयोंना ताब्यात घेतले आहे. रोडरोमीयो हे अल्पवयीन असलेचे निदर्शनास आल्याने त्यांचे पालकांना समक्ष बोलावून त्यांच्यासमोर अल्पवयीन रोडरोमिओंना समुपदेशन करुन त्यांच्यापासून पुन्हा त्रास होणार नाही, याबाबत पालकांना समज देेऊन त्यांना पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.

या पुढे कोणीही भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत शाळकरी मुलींना अगर गणेशोत्सव काळात गर्दीचे ठिकाणी महीला व मुलींना त्रास देणारे आढळून आल्यास तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन भिंगार कॅम्पचे प्रभारी अधिकारी प्रविण पाटील यांनी जनतेला केले आहे.

ही कारवाई पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी प्रविण पाटील व पोसई लोले व त्यांचे पथकातील स.फौ.राजेंद्र गायकवाड, पोलिस कर्मचारी वराट, नगरे राजू सुद्रीक, भाना खेडकर, राहुल द्वारके, महिला पो. कॉ. मोहीनी कर्डक व होमगार्ड यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –