पोलिसांच्या भन्नाट ट्विटची संपुर्ण देशात चर्चा ! ‘गब्बर को किस बात की मिली सजा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप धोका टळला नाही. सरकार आणि स्थानिक प्रशासन कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसत आहे. अशातच उत्तर प्रदेश पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृतीसाठी एक भन्नाट कल्पना शोधली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटातील एका दृश्याची मदत घेतली आहे. गब्बर को किस बात की मिली सजा’ असे कॅप्शन देत पोलिसांनी एक क्लिप शेअर केली आहे. पोलिसांचे हे भन्नाट ट्वीट अनेकांच्या पसंतीस उतरले असून त्यांच्या क्रिएटिव्हीटीची वाहवा केली आहे. त्यांना या ट्वीटला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो रिट्वीट्सही मिळाले आहेत.

गब्बर को किस बात की मिली सजा असे कॅप्शन देत पोलिसांनी एक क्लिप शेअर केली आहे. यात अमजद खान यांनी साकारलेल गब्बर हे पात्र उघड्यात थुंकताना दाखवले आहे. तर या चित्रपटातील ठाकूर यांची भूमिका साकारणारे संजीव कुमार हे त्याला गळा दाबून पकडताना दाखवण्यात आले आहे. व्हिडीओच्या अखेरिस एक संदेशही लिहिला आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविड 19 चा प्रसार वाढू शकतो. हा एक गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.