‘या’ कारणामुळे ‘कोरोना’चा सामना करण्यात जगातील ‘हे’ दिग्गज नेते अयशस्वी, मात्र मोदी यशस्वी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. या जागतिक महामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. या महामारीने ज्या देशांमध्ये हाहाःकार माजवला आहे आणि निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे ते देश गरीब आहेत की श्रीमंत, अधिक लोकसंख्येचे आहेत की कमी लोकसंख्येचे हा मुद्दा गौन आहे. मात्र, या देशांत एक समानता आहे ती म्हणजे या देशातील नेते. या देशांचे नेते अधिक लोकप्रिय आणि परंपरेनुसार काही वेगळे चालणारे असले तरी हे नेते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहे. मात्र तज्ज्ञांमध्ये हे नेते लोकप्रिय नाहीत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझिलचे जेयर बोलसोनारो यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्सिकोचे आंद्रेस मॅनुअल लोपेझ ओब्राडोर हे जनतेला आकर्षित करणारी आश्वासने देऊन आणि जुन्या व्यवस्थेला आव्हान देत लोकशाही वादी देशांत सत्तेवर आहेत. मात्र, कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली त्यावेळी हे लोकप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही युरोपातील जर्मन, फ्रान्स आणि आयर्लंड तसे आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे.

अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि मॅक्सिको सारख्या देशांचे नेतृत्त्व करत आहेत, ज्यांना वैज्ञानिकांवर शंका आहे आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळात, या आजाराला गांभीर्याने घेतलेच नाही. कोरोना विषाणूमुळे जगात 618000 लोकांचा बळी गेला आहे. यातील अधिकांश लोकांचे बळी हे याच देशांतच गेले आहेत. मात्र, या काळात भारताने अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे. तेथील कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 12 लाखाच्या वर आहे. तर दुसरीकडे भारतात मोदींनी लॉकडाऊनच्या माध्यमातून या आजाराचा सामना करण्यासाठी मोठी आक्रमकता दाखवली, असे वॉशिंग्टन येथील थिंक टँक इंटर-अमेरिकन डायलॉगचे अध्यक्ष मायकल शिफ्टर यांनी म्हटले आहे.

मायकल शिफ्टर यांनी सांगितले की, हे एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे. ज्याचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे. लोकप्रियतेच्या मागे धावण्याचा स्वभाव असणारे नेते तज्ज्ञांची आणि विज्ञानाची अवहेलना करतात. ब्राझील आणि अमेरिकेत तज्ज्ञ दृष्टीकोन आहे. मात्र, जेथे लोकप्रियतेमागे धावण्याच्या नीतीचा अवलंब होत असेल, तिथे तो लागू करणे अत्यंत कठीण होतो. ज्यामुळे समस्यातून मार्ग निघतो किंवा किमान प्रभावीपणे संकटाचा सामना तरी केला जाऊ शकतो.