बर्फी देण्याच्या अमिषाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला बर्फी देण्याचे अमिष दाखवून अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

देवेंद्र सुब्रमण्यम पांडे (५२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिजीत मुलींच्या आजीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर येथून पिडीत मुलगी व तिच्यासोबत आणखी एक अल्पवयीन मुलगी रविवारी रात्री आठच्या सुमारास जात होत्या. त्यावेळी पांडे याने त्यांना बर्फी देण्याच्या अमिषाने बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी जवळ बोलवून त्यातील एका मुलीशी त्याने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने घडलेला प्रकार घरी येऊन सांगितल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.