Porsche Car Accident Pune | बारावीला 60 टक्क्यांचा ‘बार’ उडवल्यानंतर बारमध्ये दीड तासात 48 हजारांचा चक्काचूर

पुणे : Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातात दोन अभियंता असलेल्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता (Kalyani Nagar Accident). यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचा काही तासात जामीन झाल्याने विविध स्तरातून रोष उमटू लागला. पोलिसांनी नव्याने कलमाची वाढ करत पुन्हा त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्यांनतर मुलाचे वडील विशाल अगरवाल (Builder Vishal Agarwal Arrest), आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल (Surendrakumar Agarwal Arrest) यांच्यावरही पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणात सतरा वर्षीय मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची चावी दिल्याने त्याचे वडिल विशाल अगरवालवर गुन्हा दाखल केला आणि तो अल्पवयीन असल्याने त्याला पबमध्ये एट्री देऊन दारु सर्व्ह केल्याने बार मालकासह बार टेन्डरवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर या प्रकरणात त्याच्या आजोबांनीदेखील त्याचा बचाव करण्यासाठी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याने आणि त्याचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

या अपघाताच्या दिवशी अल्पवयीन मुलगा बारावी परीक्षेच्या निकालाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पब मध्ये गेल्याची माहिती आहे. मात्र अनेकांनी असाही प्रश्न उपस्थित केला की या मुलाला परीक्षेत किती टक्के मार्क्स मिळाले होते ? ज्याने तो मित्रांसोबत पब मध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता.

याबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुलाने एका पार्टीचं बिल ४८ हजार रुपये दिल्याचे समोर आले होते.
बारावीला ६० टक्के मिळाले म्हणून या पार्टीचे नियोजन करण्यात आले होते.
साधारण वीस पंचवीस जणांना सोबत घेऊन ही पार्टी केली आणि काही तासात चक्क ४८ हजार उडवल्याचे समोर आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…