Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात हस्तक्षेप याचिका; अल्पवयीन मुलासोबत असलेल्या दोघांचा उल्लेख का नाही?

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. आता याच प्रकरणाला घेऊन आनंद दवे यांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच न्यायालयानेही ही याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेतून विविध प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. (Kalyani Nagar Accident)

” अल्पवयीन मुलाने जिथे मद्यप्राशन केले होते. त्या पबमधील काही ग्राहकांचे जबाब नोंदविणे आवश्यक होते, ते का घेतले नाहीत? बारच्या मालकांना अटक का होत नाही? ज्या नागरिकांनी त्याला मारहाण केली, त्यांचेही जबाब आवश्यक होते, ते का झाले नाहीत? उद्या जर न्यायालयात अल्पवयीन मुलाने सर्व गोष्टी नाकारल्या, तर या वरील गोष्टी पुरावा म्हणून आवश्यक आहेत. याची पोलिसांनाही कल्पना आहे. पण, नंतर हे प्रकरण कमजोर होण्यासाठी आधीच याची काळजी घेतली आहे की काय, अशी शंका येते. मी कार्डने पेमेंट केले, म्हणजे मीच त्यातील सर्व पदार्थ सेवन केले, असा अर्थ होत नाही, अशी भूमिका तो घेऊ शकतो. सलमानच्या प्रकरणासारखा बदली ड्रायव्हर उपस्थित करणे खूप अवघड गोष्ट त्याच्यासाठी नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्हाला त्याच्या जन्मदाखल्यावरही अविश्वास आहे. या मुद्द्यांसाठी सखोल तपास होणे आवश्यक असल्याने आम्ही ही याचिका दाखल केल्याचे सत्या मुळे यांनी सांगितले.(Porsche Car Accident Pune)

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासोबत असलेल्या दोन मित्रांचा कागदपत्रांमध्ये उल्लेख का नाही ? त्या मुलासोबत त्यांनाही अटक का झाली नाही? त्यांची नावे का घोषित केली नाहीत? असे मुद्दे ऍड सत्या मुळे (Adv Satya Muley) यांनी उपस्थित केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

English Is No Compulsory In XI-XII | अकरावी बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; अभ्यासक्रम आराखडा जाहीर

Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident | अपघात टाळण्यासाठी उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत नियमावली

Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली