Porsche Car Accident Pune | माझी आवडती कार, माझा बाप बिल्डर असता तर…? कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी निबंध स्पर्धेचे आयोजन
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे कार्यवाही न केल्याने सुरूवातीलाच कोर्टाने अल्पवयीन आरोपीला विविध मुद्द्यांचा विचार करून आणि काही अटी घालून जामीन दिला होता. यामध्ये ३०० शब्दांचा एक निबंध लिहिण्यास देखील आरोपीला सांगितले होते. या निबंधावरून नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता (Kalyani Nagar Accident). दोन व्यक्तींचा जीव गेल्यानंतर निबंध कसा लिहायला सांगितला, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.(Porsche Car Accident Pune)
तसेच या प्रकरणात केवळ काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेच रस्त्यावर उतरून आवाज उठवताना दिसत आहेत. इतर लोकप्रतिनिधी मात्र, सोयिस्करपणे गप्प बसले आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर थेट बोलण्यापेक्षा शालजोडीतील मारण्यात तत्पर असलेल्या पुणेकरांनी आता आगळ्या वेगळ्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पुणे युवक काँग्रेसने (Pune Youth Congress) आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी विषय देखील खास आहेत.
या स्पर्धेत प्रथम विजेत्याला ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे वयोगटाचे नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकर नेहमीप्रमाणेच स्पर्धेला मोठा प्रतिसाद देणार असे म्हटले जात आहे.
या निबंध स्पर्धेचे विषय- माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडीज), दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर?,
मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे आहेत.
पुण्यात सध्या या निबंध स्पर्धेची जोरदार चर्चा आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली