Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अश्विनी आणि अनिश यांना पोर्शेने धडक देण्यापूर्वी काय घडलं? डिनर प्लॅन अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Porsche Car Accident Pune | पुण्यात शनिवारी पहाटे पोर्शे कारने बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुण्यातल्या कल्याणीनगर भागात घडली आहे (Kalyani Nagar Accident Pune) . या अपघाताची राज्यासह देशात चर्चा झाली. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षीय मुलाने या दोघांना चिरडलं. अश्विनी कोस्टा (Ashwini Costa Jabalpur) आणि अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) अशी दोघांची नावं आहेत. या घटनेपुर्वी नेमकं काय घडलं ती माहिती समोर आली आहे.

डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच…

अनिश आणि अश्विनी यांचा मित्र अकीब मुल्लाने सांगितले की, अनिस आणि अश्विनी यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी अनेक दिवस एकत्र भेट झाली नव्हती. त्यामुळे डिनर प्लान केला आणि पबमध्ये जाण्याचं ठरवलं. त्यामुळे आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणी नगर भागात रेस्ताराँ होतं. आम्ही तिथेच गेलो. पुढे काय घणार आहे ते आम्हाला माहित ही नव्हतं. आम्ही सगळे घरी परतण्यासाठी बाहेर पडलो. तितक्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हा भीषण अपघात झाला. अनिश आणि अश्विनी यांचा मित्र अकीब मुल्लाने सांगितलं. हा प्रसंग अजूनही डोळ्यासमोर जात नाही, असं अकीबने सांगितलं. (Porsche Car Accident Pune)

अनिश खूप समजूतदार होता

अनिश आणि मी एकाच वर्गात होतो. आम्ही एकत्र इंजिनिअरिंग केलं आहे. तसेच आम्ही एकाच वयाचे असल्याने आमच्या पटकन मैत्री झाली. अनिश खूप समजूतदार होता. त्याच्या जाण्याने माझं खूप नुकसान झालं आहे. त्याच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अशी माहिती अकिबने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

अनिशला अमेरिकेला जायचं होतं

अनिश हा मूळचा मध्य प्रदेशातला होता. त्याने डी. वाय पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं आहे. त्यानंतर तो एका कंपनीत इंटर्नशिप करत होता. तिथेच त्याची आणि अश्विनी कोस्टाची ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. अनिश हा खूप हुशार विद्यार्थी होता. त्याला पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला जायचं होतं ते त्याचं स्वप्न होतं. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा कोडिंगविषयी चर्चा करायचो. एक मित्र म्हणूनही अनिश खूप चांगला माणूस होता, असे अकिबने सांगितले.

त्याला फारसे मित्र नव्हते

अनिश विमान नगर या ठिकाणी एका घरात भाडे तत्वावर राहात होता. त्याला फारसे मित्र नव्हते.
तो त्याच्या लहान भावासह त्या घरात राहात होता. आम्हीच त्याचे जवळचे मित्र होतो.
तसंच त्याला विविध पदार्थ खाण्याची आवड होती.
आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर तो आवर्जून दाल तडका मागवत असे अशीही आठवण अकिबने सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त