सुजय विखेबरोबर काँग्रेसचे नेते जाणार भाजपमध्ये ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबरोबर अहमदनगर येथील काँग्रेसचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याबरोबर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

नगर महापालिकेतील काँग्रेसचे अनेक नगरसेवक विखे यांच्या भाजपप्रवेशासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबरच या नेत्यांच्याही भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुजय विखे यांनी काही वेळापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली असून त्यांच्यासमवेतच ते मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.