अभिनेता रणवीर सिंग बनणार इच्छाधारी सुपरहिरो ‘नागराज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध कॉमिक पात्र नागराजच्या सिनेमाबद्दल लवकरच घोषणा केली जाऊ शकते. राज कॉमिक्सचे संजय गुप्ता यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून तसे संकेत दिले आहेत. संजय गुप्ता यांनी 7 डिसेंबर रोजी फेसबुकवर ओळ एक लिहिली होती. “आजकाल करण जोहर आणि रणवीर सिंग यांची नागराजसोबतची भेट वाढली आहे.” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. जर हे झालं तर राज कॉमिक्सच्या पात्रांवर बनलेला हा पहिलाच सिनेमा असेल.

पहिला कॉमिक सुपरहिरो सिनेमा
सप्टेंबरमधील एका मुलाखतीत राज कॉमिक्सच्या स्टुडिओचे हेड संजय गुप्ता म्हणाले होते की, “नागराजवर सिनेमा बनवण्याचा विषय सध्या पहिल्या टप्प्यात आहे. आशा करतो की, 2020 पर्यंत हा सिनेमा रिलीज केला जाईल. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिरोंवर सिनेमे बनले आहेत. इंडियन कॉमिक बुक सुपरहिरोवर बनणारा हा पहिला सिनेमा असेल.” असंही ते म्हणाले होते.

संजय गुप्ता यांच्या पोस्टमध्ये रणवीर सिंगचा उल्लेख आहे. त्यामुळे या सिनेमात नागराजच्या प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग असेल हे अप्रत्यक्षपणे त्यांनी जाहीर केलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Visit : policenama.com